श्री . सिताराम पाटील गायकर यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा अगस्ती साखर कारखान्याचे व्हा चेअरमन
मा .सिताराम पाटील गायकर साहेब
 यांचा वाढदिवस त्यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
ऊसतोडणी कामगार ते साखर कारखाना व्हा. चेअरमन,
सोसायटी चे सेक्रेटरी ते जिल्हा बँक चेअरमन, 
गावच्या दूध संस्थेचे संचालक ते महानंदा चे संचालक
मा .सिताराम पाटील गायकर यांचा जन्म मोग्रस या लहानशा खेडे गावात झाला ,पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण गावातच झाले ,पाचवी ते सातवी पर्यंतचे शिक्षण माॅर्डन हायस्कूल अकोले तर आठवी ते दहावी न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे झाले. त्यांचे मामा धामणगावपाटचे चौधरी साहेब त्या काळातील एम .एस्सी ,पीएचडी धारक पुणे  जिल्हा कृषी अधिकारी होते .
  गायकर साहेबांची गावाकडे दहा एकर शेती परंतू पाणी नाही त्यामुळे त्यांनी शिक्षणा नंतर मामांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पहिली संकरित टोमॅटो लागवड केली, तीही खंडाने त्यांनी एकाच वर्षात १९८० साली पाच लाख नफा मिळवून उंचखडक गावात सात एकर शेती घेतली, संगमनेर, व श्रीरामपुर कारखान्यात सपत्निक ऊस तोडणी केली. गावात पहिली दुध डेअरी काढली. सोसायटीचे सेक्रेटरी झाले, पुढे दुध संघाचे संचालक अगस्तीचे स्थापनेपासून संचालक, उपाध्यक्ष, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष,  अध्यक्ष, महानंदाचे संचालक असा प्रवास केला तो केवळ सामान्य कार्यकर्ता सांभाळल्याने ,त्याच्या सुख दुखात सहभागी झाल्याने. 
 कधीच कुणाला दुखवायच नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही हेच त्यांची जीवनशैली ,येत्या काही दिवसांत आपण त्यांच्या जिवनावरील अत्यंत बारकावे असलेला व तरुण पिढीला मार्गदर्शक लेख व " लोकनेते  सिताराम पाटील गायकर " हे त्यांचे चरित्रपर पुस्तकही वाचण्यासाठी येइल परंतू माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब, कै. भाऊसाहेब हांडे  यांचे सहवासात हा सत्पुरुष जन्मला हेच आमचे भाग्य 
वाढदिवसाच्या अण्णांना हार्दिक शुभेच्छा

Comments