कळस कृषी प्रदर्शन चे उदघाटन समारंभ


 कळस कृषी प्रदर्शनचे उदघाटन २३जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ना रामदास आठवले यांचे शुभहस्ते
अकोले (प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे कळस कृषी प्रदर्शनचे उदघाटन २३जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे समोर अकोले येथे होणार आहे
         या प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या शुभहस्ते माजी मंत्री मधुकरराव पिचड, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, संगमनेर साखर कारखानाचे अध्यक्ष माधवराव कानवडे जिल्हा परिषदेच्या कृषी चे माजी सभापती अजय फटांगरे व २१ गावचे सरपंच यांच्या उपस्थितीत  संपन्न होणार आहे.
            ग्रामीण भागातील शेतकरी यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान माहीत व्हावे साठी ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलांनी एकत्र येऊन छत्रपती युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन विभाग, ऊर्जा विभाग यांच्या सहकार्याने कळस कृषी प्रदर्शन सुरू केले गेले पाच वर्षांपासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. 
            या वर्षी च्या कृषी प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे कृषी प्रदर्शन, डांगी व खिलार जनावरे यांचे प्रदर्शन खरेदी विक्री, घोडे सवारी, बैलांचा फॅशन शो, उत्कृष्ट गाय निवड, मशिनरी प्रदर्शन, महिला महोत्सव, खाद्य महोत्सव, अकोले महोत्सव, बाल आनंद नगरी असे विविध प्रकारचे आहेत 
               यानिमित्ताने कृषी प्रदर्शनात अनेक मान्यवर व्यक्तींची मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे व अकोले फेस्टिव्हल निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे यामध्ये २३ जानेवारीला सकाळी १० वाजता उदघाटन होणार असून सायंकाळी ७वा महाराष्ट्र ची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ तारखेला महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने डिझाईन केलेला *HOPE* (आशा) हा युवकांना स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन करणारा विशेष सेमिनार ठेवला आहे. दुपारी १२:३० वाजता आयोजित या कार्यक्रमात MKCLचे जनरल मॅनेजर अमित रानडे मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या गावात राहून, स्वयंरोजगाराच्या संधी सांगत, करिअरची दिशा दाखवणारा हा विशेष कार्यक्रम हे यंदाच्या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तर सायंकाळी ७ वाजता राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. २५ जानेवारी ला  महिला बचत गट एक उद्योजकता याविषयी चे मार्गदर्शन सकाळी११ वाजता होणार आहे  असून सायंकाळी ७ वाजता भूमिपुत्र गौरव सोहळा होणार असून लावणी मोहोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. तर २६ जानेवारीला सकाळी १२वाजता युवा आयकॉन व  आय एस अधिकारी मार्गदर्शन महाऊर्जाचे आयुक्त कांतीलाल उमप, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट चे विकास देशमुख होणार  होणार असून दुपारी ४वाजता डांगी खिलार, गाय व पशु यांचे बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे व सायंकाळी ७ वा देशभक्ती पार गीते व नृत्य सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सारेगमप लिटिल चाम्प रोहित राऊत, सिने अभिनेते ऋत्विक केंद्रे, भक्ती धुमाळ, प्रतीक्षा कळमकर, दिशा परदेशी आदी उपस्थित राहणार आहे.
       याकार्यक्रमात खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ ना. राजश्री घुले, माजी आमदार वैभवराव पिचड, आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार डॉ किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके सभापती सुनील गडाख, मीराताई शेटे, माजी सभापती कैलासराव वाकचौरे, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे, उपसभापती दत्तात्रय देशमुख रिपाई चे राज्य सचिव विजयराव वाकचौरे, अभिनव चे मधुकर नवले, जिप सदस्य रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, रमेश देशमुख, महेंद्र गोडगे, सुनीता भांगरे, सुषमा दराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष के डी धुमाळ, नगराध्यक्ष संगीता शेटे, आदी उपस्थित राहणार आहेत.
            तर जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम पाटील, पशु संवर्धनचे अधिकारी सुनील तुंबरे, जिल्हा शिक्षणअधिकारी रमाकांत काठमोरे, तहसीलदार मनोज कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, पी आय जोंधळे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदी अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
      तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती युवा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे पन्नास हजार विद्यार्थ्यांना व पन्नास हजार महिला पालक यांचे साठी एक लाख मोफत पास चे वाटप करण्यात आले असून त्यात आईला विद्यार्थ्यांन सोबत आणावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Post a Comment