पद्मश्री व महाराष्ट्र केसरी हे पुरस्कार अकोले तालुक्याचा बहुमान

पद्मश्री व महाराष्ट्र केसरी हे पुरस्कार मिळवून  सौ राहीबाई पोपेरे व हर्षवर्धन सदगीर यांनी तालुक्याला बहुमान मिळवून दिला :- पिचड
अकोले :- ( शांताराम काळे ) पद्मश्री व महाराष्ट्र केसरी हे पुरस्कार मिळवून  सौ राहीबाई पोपेरे व हर्षवर्धन सदगीर यांनी तालुक्याला बहुमान मिळवून दिला असून भावी पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपले कार्य कर्तृत्व सिद्ध करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवून इथली मातीला बहुमान मिळवून द्यावा असे सांगतानाच ज्या गावात व मातीत हि माणसे जन्मली त्या मातीचे दर्शन घेण्यासाठी मी आज आलो आहे असे भावनिक उदगार माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी कोंभाळणे येथे बोलताना काढले .    
       
                       पद्मश्री पुरस्कार सौ राहीबाई पोपेरे व महाराष्ट्र केसरी पुरस्कार हर्षवर्धन सदगीर  याना प्राप्त झाल्याने माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे, उपसभापती दत्तात्रय देशमुख, अकोले नगरपंचायत अध्यक्ष सौ संगीता शेटे, उपाध्यक्ष बाळासाहेब वडजे, संचालक अशोक देशमुख, रामनाथ  वाकचौरे, कचरू पाटील शेटे, सुनील दातीर, राजेंद्र डावरे, बाळासाहेब ताजणेे, नगरसेवक प्रकाश नाईकवाडी, नामदेव पिचड, सुरेश लोखंडे, सचिन शेटे, पंचायत समिती सदस्य सौ सीताबाई गोंदके, सौ माधवी जगधने, सौ सारिका काडळे, गणपत देशमुख, सुरेश भांगरे, गोकुळ कानकाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते 
  मधुकर पिचड यांनी बायफ संस्था मी मंत्री असताना तालुक्यात काम करायला लागली आदिवासी उत्थानाचा कार्यक्रम त्यांनी राबविला महिला बचत गटातून नवनिर्मिती करून राहीबाई सारख्या कर्तृत्ववान महिला तयार झाल्या या महिलांनी तालुक्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन त्यांनी पुरस्काराचे महत्व वाढविले आहे चंद्रकांत दादा यांनी राहीबाईंना हक्काचे घर मिळवून देतानाच बी बियाणाचे संवर्धन होण्यासाठी दिलेले योगदान महतवाचे आहे तर हर्षवर्धन सदगीर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपले कार्य कर्तृत्व सिध्द केले. असे मत व्यक्त केले
          वैभव पिचड म्हणाले  राहीमावशी यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे. त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार महिला व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपरिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही. तालुक्याचे भाग्य असल्यामुळेच पद्मश्री व महाराष्ट्र केसरी हे सन्मान आपणाला मिळाले.
       सत्काराला उत्तर देताना राहीबाई म्हणाल्या मला पुरस्कार मिळाला असला तरी माझ्या मातीने माझा आज माजी मंत्री पिचड साहेबांच्या हस्ते सन्मान केला तो लाख मोलाचा असून चंद्रकांत दादा यांनी मला खूप मदत केली त्यांची मी ऋणी आहे तर किसान सदगीर यांनी पिचड साहेब व तालुक्याने जे प्रेम दिले ते अधिक महत्त्वाचे आहे.   
     ढोल, ताशा , व फटक्याची आतिषबाजी करीत सौ राहीबाई पोपेरे, पती सोमा पोपेरे, मुले तुकाराम, सखाराम, नागू , बायफचे जतिन साठे, हर्षवर्धन चे आजोबा किसन पाटील सदगीर वडील मुकेश आई यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर कोंभाळणे ग्रामस्थ व बायफ च्या वतीने पिचड पिता पुत्रांचा सत्कार केला. यावेळी अगस्ती सहकारी साखर कारखान्याकडून धनादेश देण्यात आला . 
           प्रास्तविक बायफचे विभागीय अधिकारी जतिन साठे यांनी, सुत्रसंचलन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे तर आभार सन्तु सदगीर यांनी मानले.


चौकट - मी ४० वर्षात काय केले तर राहीबाई व हर्षवर्धन यांच्यासारखे कर्तृत्वान माणसे जन्मली हेच फलित आहे . वयाच्या ८० व्या वर्षी हा तालुक्याला बहुमान अधिक महत्वचा आहे. टीकाकारांना टीका करू द्या असेही पिचड म्हणाले

Comments