अकोले तालुक्यातील प्रेमीयुगलाची विषप्राशन करून आत्महत्या

विषप्राशन करून प्रेमी युगलाची आत्महत्या
अकोले तालुक्यातील घटना 
 
राजूर ( प्रतिनिधी ):- अकोले तालुक्यातील साकीरवाडी येथील तरुण व तरुणीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी  उघडकीस आली आहे. या घटनेमुळं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
           याबाबद ची घटना अशी की,  साकीरवाडी येथील अशोक मारूती भांगरे ( वय ३२) व भाग्यश्री द्रोणाचार्य भांगरे ( वय १८) यांनी गावातील मारूती विठोबा भांगरे यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. यातील तरुणी ही करमाळा (जि.सोलापूर) येथे चुलत्याकडे शिक्षण घेत होती. मात्र दोघांचे प्रेमसंबध होते. अशोकचे लग्न झालेले असुन त्याला पत्नी व तिन मुले आहेत. प्रेमप्रकरण उघडकीस येण्याच्या भितीने त्या दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे.
        पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कैलास नेहे करत आहे.

Comments