भारतीय रेल्वे च्या कनिष्ठ अभियंता पदी इंदोरीचे अक्षय देशमुख यांची निवड

भारतीय रेल्वे भरती मध्ये कनिष्ठ अभियंता पदी इंदोरीचे अक्षय देशमुख 
अकोले :- भारतीय रेल्वे भरती मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी इंदोरीचे अक्षय सुभाष देशमुख यांची निवड झाली आहे.

       भारतीय रेल्वे बोर्ड च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत अक्षय देशमुख पहिल्या प्रयत्नत यश मिळवले आहे अक्षयचे शिक्षण बी ई सिव्हिल असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पद्मावती नगर , अगस्ती विद्यालय, अगस्ती कॉलेज तर इंजिनिअरिंग एम आय टी कॉलेज पुणे येथे झाले असून रेल्वे च्या १३ हजार जागांसाठी ३१ लाख मुले यांनी परीक्षा दिली होती त्यात देशमुख यांची निवड झाली. या स्पर्धा परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन न घेता स्वतः अभ्यास करून हे यश मिळवले असून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मनोदय अक्षय देशमुख यांनी व्यक्त केला.ते इंदोरी चे माजी उपसरपंच एस के देशमुख यांचे चिरंजीव तर सामाजिक कार्यकर्ते किसनराव देशमुख यांचे नातू आहेत. अगस्ती विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक शांताराम देशमुख व कृषी विद्यालय कळवण चे प्राचार्य रमेश देशमुख यांचे पुतणे आहेत
        त्यांच्या निवडीचे माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड, हभप निवृत्ती महाराज देशमुख, श्रीरामपूर कृषी अधिकारी रामराव कडलग, अकोले तालुका भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे , शिवाजी हासे, एकनाथ देशमुख, अशोक आवारी, सिताराम नवले, चंद्रभान देशमुख यांनी अभिनंदन केले

Comments

  1. The Lucky Club Casino Site - The Lucky Club
    The Lucky Club Casino is a new addition to The Lucky Club Casino. We've always had the right to luckyclub place our bets on slots, but we have to admit we do miss

    ReplyDelete

Post a Comment