ब्रह्मलीन प पु सुभाष पुरी यांची पुण्यतिथी

 प.पु. सुभाष पुरी महाराज यांची तिसरी पुण्यतिथी सोहळा १फेब्रुवारी ला
कळस:- अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर, संगमनेर- अकोले तालुक्याचे सरहद्दीवर वसलेल्या कळस बु येथे आपल्या वास्तव्याने पावन व पुनीत केलेल्या प.पु. सुभाष पुरी महाराज यांची तिसरी पुण्यतिथी सोहळा रथ सप्तमी ला शनिवारी १ फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आला आहे.


              पुण्यतिथी निमित्ताने प.पु. सुभाष पुरी महाराज यांच्या प्रतिमेची सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांचे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांचे हरिकीर्तन सकाळी ९ वाजता होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद भंडारा होईल. 
           कळसेश्वर टेकडीवर आपले स्वहस्ते वृक्षारोपण  करून नंदनवन फुलविण्याचे महान कार्य प.पु.सुभाष पुरी महाराज यांनी केले. त्यांचे प्रेरणेने गुरुपौर्णिमा, दत्तजयंती उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्र उत्सव सुरू केले असून त्यांच्या समाधी नंतर आता पुण्यतिथी  साजरी केली जात आहे. कळसेश्वर देवस्थान, कळस बु येथे होणाऱ्या या कार्यक्रमास सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कळस ग्रामस्थ व भक्तगण यांनी केले आहे.

Comments