बिबट्याला समोर पाहून महिलेचा हृदयविकाराचा तीव्र झटक्याने महिलेचा मृत्यू
संगमनेर: वाघाला पहिल्या वर भल्या भल्यान ची भंबेरी उडते मात्र अचानक बिबट्याला पाहून महिलेचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यांनच्या कुटुंबला मदत मिळावी म्हणून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेरावा ग्रामस्थांनी घातला
संगमनेर तालुक्यातील जाखोरी शिवारातील शीलाबाई लहानू पानसरे वय ४८ असे मृत महिलेचे नाव आहे. शीलाबाई ह्या शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शेतात नेहमी प्रमाणे काम करत होत्या. त्यांना अचानक त्याच्या समोर बिबट्या दिसला. अचानक समोर बिबट्याचे दर्शन झाल्याने घाबरून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल निलेश आखाडे, वनरक्षक एस आर पाटोळे यांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी करीत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला. तसेच ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत मयताच्या कुटुंबियांना वनविभागाकडून मदत मिळण्याची मागणी केली.
शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. वनविभागाकडून बिबट्याच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाला तरच मदत मिळते असे वनक्षेत्रपाल निलेश आखाडे यांनी सांगितले
मदत भेटलीच पाहिजे.... वन विभागाच्या लोकांवर्ती/त्यांच्या घरच्यांवर्ती असा प्रसंग आला तर ते काय करतील... योग्य तो निर्णय झाला पाहिजे .....नाहीतर शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवली तर ... जंगलाचा राजा हा पुढच्या लहान मुलांना फक्त फोटोटलाच पघायला मिळेल....
ReplyDeleteवनविभागाचे कर्मचारी बोलतात की काही झालं तरच मदत भेटते ........ अरे पण त्यांचा मृत्यू हा नेसर्गिक नाही ना ....त्या बिबट्या मूळ झाला आहे .... काही पण निर्णय घेऊन मोकळ होऊ नका,😡😡😠.. ही शेवटची orning आहे बाकी....
ReplyDelete