पाककला" राज्यस्तरीय स्पर्धेत अँड धनश्री वाकचौरे हिने प्रथम

पाककला" राज्यस्तरीय स्पर्धेत अँड धनश्री वाकचौरे हिने प्रथम 
ठाणे ( प्रतिनिधी ):- आंतरमहाविद्यालयीन "पाककला" राज्यस्तरीय स्पर्धेत अँड धनश्री वाकचौरे हिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
         ठाणे येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज मध्ये संपन्न झालेले पाककला या विषयात कॉलेज विद्यार्थीनीच्या स्पर्धा संपन्न झाला. अग्नीचा वापर न करीत ४५ मिनिटात पाककलेत नैपुण्य दाखवायचं होत कुठलाही पदार्थ बनविताना ज्वलन महत्वचे असते परंतु गॅस अथवा सरपण चा वापर करायचा नाही अश्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत ३५ युवती व ग्रुप नी भाग घेतला होता. 
त्यात कु वाकचौरे हिने आरोग्यदायक ब्रेड पिझा ज्या मध्ये शिमला मिर्ची, कांदा, मक्याचे दाणे, आले लसूण ची चटणी चिज चा वापर केला तर बिस्कीट चाट मध्ये मोन्याको बिस्कीट व विविध प्रकारच्या भाज्या वापरल्या होत्या आणि लेमन मोजीटो मध्ये लिंबू आणि पुदिना यांचा वापर करून असे तीन पदार्थ बनविले होते. विशेष म्हणजे ज्या भाज्या खाण्यास लहान मूल नकार देतात ते मात्र हे बिस्कीट चाट आवडीने खातात.
        धनश्री वाकचौरे ही लॉ कॉलेज ची विद्यार्थिनी असून कळस बु येथील रहिवासी आहे ह्या स्पर्धेतील यशाबद्दल सत्यनिकेटन संस्थेचे अध्यक्ष अँँड मनोहरराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Post a Comment