बी. जे खताळ विद्यालयाचे सहलीला अपघात

शालेय सहल घेऊन जाणाऱ्या ST बसला भीषण अपघात, 18 जण गंभीर जखमी
बी. जे खताळ विद्यालयाचे विद्यार्थी

अनिस शेख (प्रतिनिधी)मावळ
 25 डिसेंबर: मुंबई-पुणे महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 15 विद्यार्थ्यांसह तीन शिक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तळेगाव खिंडीत पहाटे चारच्या सुमारास सहलीला गेलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिल्याने उसाची ट्रॉली महामार्गावर पलटली या कारणाने एसटी बस मधील एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी आणि तीन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेरच्या बी. जे खताळ विद्यालयाचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. खताळ महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांची अलिबागला सहल गेली होती. सहलीहून परत संगमनेरला जात असताना हा अपघात झाला. मुंबई-पुणे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेनंतर उसाच्या मोठ्या महामार्गावर आल्या तर एसटीही बंद पडल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. सध्या पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने वाहतूक वळविण्यात आली आहे. दरम्यान अशा पद्धतीनं ट्रॉली महामार्गावर बंद पडली असल्याची पूर्व कल्पना कोणालाही देण्यात आली नव्हती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबई-पुणे महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे धोकायदयक बनत चालला आहे. बसमध्ये एकूण 44 विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 15 विद्यार्थी आणि तीन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. 
       या अपघातात चैताली संजय घुले, शिवाजी रामहरी शेटे, अनिकेत दत्तात्रय घुले, किरण सुखदेव कोकणे, प्राची अशोक गुंजाळ, साक्षी अरुण कोकणे, कार्तिकी शांताराम खताळ, दीपाली भालचंद्र गोडसे या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक चाँदसाब अत्तार, शिक्षक सखाराम पांडूंरंग भालेराव व बसचे चालक नईम रफीक शेख हे जखमी झाले आहेत. नानासाहेब बर्डे व निकिता खताळ या दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून चैताली घुले या विद्यार्थीनीचे हाड मोडल्याने तिला पुण्याच्या कोठारी रुग्नलयात हलविण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी किरण सुखदेव कोकणे या विद्यार्थ्याची स्थिती गंभीर असल्याचे समजते. जखमी असलेल्या सर्वांवर तळेगाव दाभाडे येथील पवना रुग्णालयात उपचार सुरु असून उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांना संगमनेरला पाठविण्यात आले आहे. 
संगमनेर पंचायत समितीचे सभापती निशाताई कोकणे यांचे पती दत्तात्रय कोकणे यांनी तातडीने अपघात स्थळाकडे रवाना होऊन जखमी ना मदत व उपचार साठी सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष भास्करराव खताळ पाटील यांनी ही तातडीने मदत उपलब्ध करून दिली 

Comments