नागरिकत्व सुधारणा विधेयकाची चांगली बाजू जनतेसमोर भाजप कार्यकर्त्यांनी मांडावी
:- राजेंद्र गोंदकर
शिर्डी (प्रतिनिधी ) :- आपल्या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झालेमुळे नागरिकत्व सुधारणा विधेयक देशात लागू करण्याची वेळ आली असून हे सर्व सामान्य जनतेपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी पोहचवा असे मत भाजप उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी व्यक्त केले.
शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी भाजपचे जिप गटनेते जालिंदर वाकचौरे, अकोले तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, नेवासा तालुका अध्यक्ष नितीन दिनकर, राहता तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुनील वाणी, संगमनेर शहर अध्यक्ष राजेंद्र सांगळे, संगमनेर तालुका अध्यक्ष डॉ अशोक इथापे, कोपरगाव तालुका अध्यक्ष रोहम आदी उपस्थित होते.
नागरिकत्व सुधारणा विधेयक हे भारतात राहणारे व्यक्ती विषयी नसून देशात बाहेरून आलेले ना आहे. त्यामुळे मूळ नागरिकांनी घाबरून जाऊ नये ह्या जनजागृती साठी व भाजप कार्यकर्त्याना हा कायदा कळावा यासाठी प्रत्येक तालुक्यात एक कार्यक्रम व प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जाणार आहे. तसेच उत्तर नगर जिल्ह्याचे वतीने एक समर्थन मोर्चा आयोजित केला जाईल असेही सांगितले.
भाजपचे जिप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी भाजप ने नगर जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर नगर जिल्हा शिर्डी तयार केला व प्रथमच अध्यक्ष पदी राजेंद्र गोंदकर यांची निवड केली. संघटनात्मक दृष्टीने शिर्डी जिल्हा महाराष्ट्रत नागपुर, जळगाव प्रमाणे एक नंबर करू यासाठी सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी बबन मुठे, भाऊसाहेब वाकचौरे, अनिल भनगडे, दिनेश सोमाणी, सतिष सौदागर, चंद्रकांत घुले आदीनी विविध सूचना मांडल्या.
Comments
Post a Comment