अकोले तालुक्यातील मजुरावर अँसिड हल्ला
अकोले तालुक्यात खळबळ
अकोले ( प्रतिनिधी ) अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे मजुरावर अँसिड हल्ला झाला आहे. त्यामुळं तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शहरी भागातील अँसिड हल्ल्यांच्या घटनांचे लोन आता अकोलेसारख्या ग्रामीण, आदिवासी भागातही पसरले आहे. व्यक्तिगत भांडणातुन एका आदिवासी ठाकर समाजाच्या मजुरावर अँसिड हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
या घटनेत अमृता भीमा पथवे (वय-30, रा.टाहाकारी, हल्ली-चास,ता सिन्नर) हा मजूर गंभीर भाजला असून याप्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या व्यक्तीचे बाबासाहेब रामनाथ एखंडे असे नाव आहे. काल राञी हा गुन्हा दाखल झाला असून पोलिस.गुन्हा रजिस्टर २०२०नुसार असुन भा.दा.वी. कलम ३२६(अ),४५२,३४प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हा अकोले पोलिस हे करत आहेत.
Comments
Post a Comment