कळस ग्रामपंचायतच्या प्रभाग आरक्षण ग्रामसभा आटोपती घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली.
कळस ( प्रतिनिधी ):- ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत प्रभाग आरक्षण करताना लोकसंख्या व सदस्य यांचा ताळमेळ न घातल्याने केलेली रचना चुकीची असल्याने प्रभाग रचना फेटाळून लावण्यात आल्यामुळे ग्रामसभा आटोपती घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली.
कळस बु ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा मंगल कार्यालयात सरपंच सौ योगिता वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभाग रचना व आरक्षण काढण्याची अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी जे.टी. सोनवणे हे होते तर तलाठी जी. आर. गायकवाड, ग्रामसेवक के.पी.भोर हे होते. यावेळी उपसरपंच दिलीप ढगे, सदस्य रावसाहेब वाकचौरे, ईश्वर वाकचौरे, बाळासाहेब शिर्के, रत्ना वाकचौरे, नीलम गवांदे आदी उपस्थित होते.
कळस ग्रामपंचायतची लोकसंख्या ४५५४ असून सदस्य संख्या १३ आहे एका सदस्य यासाठी अंदाजे ३५० लोकसंख्या गृहीत धरली असताना वार्ड नंबर १ व ५ मध्ये दोन सदस्य संख्या व २,३,४ वार्ड मध्ये तीन सदस्य संख्या असून १,२,३ ला १०५० लोकसंख्या गृहीत धरली तर वार्ड नंबर ४ व ५ ला ७०० लोकसंख्या गृहीत धरून वार्ड रचना व नकाशा करण्यात आला व त्यानुसार वार्ड मध्ये आरक्षण जाहीर करण्यास श्री सोनवणे सुरवात केली
माजी सरपंच तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी आक्षेप घेतला. एक सदस्यासाठी अंदाजे ३५० लोकसंख्या गृहीत धरले तर वार्ड नंबर१ मध्ये १०५० लोकसंख्या व वार्ड नंबर४ मध्ये तीन सदस्य संख्या असताना ७०० लोकसंख्या दाखवून केलेली वार्ड रचना चुकीची आहे त्यास आमचा आक्षेप आहे जर वार्ड नंबर१ ला ७०० लोकसंख्या पाहिजे त्यामुळं सर्व वार्ड रचना चुकीची आहे ही ग्रामसभा आपली वार्ड रचना फेटाळीत आहे असा ठराव मांडला त्याला ज्ञानदेव निसाळ, राजेंद्र गवांदे, रामभाऊ वाकचौरे यांनी अनुमोदन दिले मुळे कळस ग्रामपंचायत आरक्षणची चुकीचे केलेमुळे ग्रामसभा आटोपती घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली.
Comments
Post a Comment