राजकारणी सी ए ए व एन आर सी चा चुकीचा अर्थ काढून देशातील मुस्लिम व अल्प संख्याक समाजाचे माथी भडकवू पाहात
राजकारणी सी ए ए व एन आर सी चा चुकीचा अर्थ काढून देशातील मुस्लिम व अल्प संख्याक समाजाचे माथी भडकवू पाहात :- देशमुख
अकोले (प्रतिनिधी ) माझे राष्ट्र सर्व श्रेष्ठ राष्ट्र आहे हे ब्रीद घेऊन भारतातील हिंदू मुस्लिम शीख इसाई व सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी एकत्र येऊन नव राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पूर्ण केल्यास जगाच्या नकाशावर भारता चे सर्वोच्च स्थान निर्माण होईल असे उद्गार पतित पावन संघटनेचे प्रांत अध्यक्ष व इतिहासकार एस झेड तथा सोपानराव देशमुख यांनी बोलताना काढले तर राजकारणी सी ए ए व एन आर सी चा चुकीचा अर्थ काढून देशातील मुस्लिम व अल्प संख्याक समाजाचे माथी भडकवू पाहात असून त्याने देशाचे भले कधीच होणार नाही असे हि तेम्हणाले .
राजूर तालुका अकोले येथे सी ए ए व एन आर सी च्या समर्थनार्थ भव्य तिरंगा रॅली काढून परिसरातील तरुण व नागरिकांनी या कायद्याचे समर्थन केले . यावेळी श्रीराम मंदिरातून रॅलीला सुरुवात झाली हजारोच्या संख्येने यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र शहा होते अभिजित भांबुर्डेकर , विक्रम जगदाळे , सतीश चांडोले , अशोक मृतड्क , ललित मृतड्क , दर्शन ओहरा आदींनी या रॅलीचे नेतृत्व केले . यावेळी परमेशवर बोरुळे उत्तर नगर जिल्हा विधार्थी संघटक , श्रीमती रजनी टिभे ,गोकुळ कानकाटे , आदींचे भाषणे झाली
बोलताना सोपानराव देशमुख म्हणाले १९८६ , १९९२ मध्ये सी ए ए कायद्यात सुधारणा झाली त्यानंतर २००३मध्ये सुधारणा झाली २००५ मध्ये पी चिदम्बरम. यांनी सी ए ए कायदा लोकसभेत मांडला मात्र तो लागू झाला नाही मात्र आज त्या कायद्याच्या विरोधात जी माणसे बोलता त्यांनीच या कायद्याचे पूर्वी समर्थन केले होते ,या कायद्याची गरज का लागली १९४७ साली जिनांनी या देशाची फाळणी केली देशाचे दोन तुकडे झाले १० लाख माणसे कापली गेली हजारो महिला पळविल्या गेल्या
१९४७ पाकिस्तानचा हिंदू जे एन मंडल कायदा मंत्री होता ,आर एस एस या देशाचे रक्त आहे व या रक्ताशिवाय देश जगू शकत नाही ,पाकिस्तानात २टक्के हिंदू ,बंगला देशात दीड टक्का मोठ्या प्रमाणात धर्मांतर,मोदी नी कायदा केला तो ५वर्षे रहिवासी असावा , मात्र विरोधी राजकारणी हा कायदा मुसलमानाच्या विरोधात , अल्पसंख्याक विरोधात असल्याचे सांगून देशात अशांतता पसरवीत आहे देशातील मुसलमान ५ पिढ्यांपूर्वी हिंदूच होता तो आपला भाऊबंद होता हा कायदा नागरिक त्व देण्याचा ,असून भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला म्हणणारे जे एन यु मध्ये डाव्यांनी हा उच्छाद मांडला ,देशातील राजकारण्यांनI देशाचे तुकडे केले जाती जाती मध्ये भांडणे लावले
या देशातील माणूस देशभक्ती घरातून देशभक्ती करतो त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे तरच देश सुरक्षित राहील त्यासाठी सी ए ए. चा विरोधात ज्यांनी मोर्चे काढले ते हिंदू व अल्प संख्याकाच्या विरोधात आहे .७०वर्षात चुकीचे राजकारण केले गेले ,इटलीचे रताळी सावरकरांच्या विरोधात बोलून त्यांना देशद्रोही ठरवतात ,सावरकर कुटुंबीय देशासाठी झटत होते,देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या तलवारी घेऊन लढण्याचे काम नाही मात्र देशात अशांतता पसरविणाऱ्या रस्त्यावर उतरून विचारले पाहिजे ,मोदीनी ३७०,३५ए कलम रद्द केले हे देशाचे भाग्य आहे,हिंदू मुस्लिम स्री यांना सन्मान देण्याचा निर्णय तीन तलाख रद्द करून दिला ,बोगस आधार कार्ड शोधा v बोगस लोकांना हुसकावून लावू ,लोकांना गुमराह केले जात आहे ,मुस्लिमांनी मुस्लिम बांधवांनी सामील होण्याची गरज आहे माझे राष्ट्र सर्व श्रेष्ठ आहे हे ब्रीद घेऊन देशातील हिंदू मुस्लिम व सर्व जातीधर्माचे लोकांनी एकत्र येऊन नव राष्ट्र निर्मितीचे काम करावे ,सी ए ए ,एन आर सी बाबत चुकीचा अर्थ काढून देशातील लोकांचे माथे भडकवू नका ,डॉ बाबासाहेबआंबेडकरांनी सविधान लिहिले त्या संविधानाचे जतन करण्याचे काम आजही सुरू आहे मात्र राजकारणातील काही किडे देश पोखरण्याचे काम करीत आहे
सुत्रसंचलन श्रीराम पन्हाळे तर आभार अभिजित भांबुर्डेकर यांनी मानले सोबत फोटो
Comments
Post a Comment