शनिवारी अकोले बंद

बंद बंद अकोले ! तालुक्यातील भूमीपुत्रासाठी शनिवारी अकोले बंद
अकोले तालुक्याचे भूमिपुत्र निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या वर गुन्हा दाखल करण्याचे निषेधार्थ व आम्ही इंदोरीकर महाराज यांचे सोबत यासाठी शनिवारी दि 15 फेब्रुवारी ला अकोले बंद ठेवण्यात येणार आहे.
काय म्हणाले इंदोरीकर
इंदोरीकर महाराज जे काही वाक्य बोलले आहे ते या गुरुचरित्रात दिलेल्या 37 व्या अध्यायाच्या संदर्भाने... माहितीसाठी ओवी क्रमांक 51 पासून वाचून बघावं.. 
महाराजांना बदनाम करून ज्याला मोठ व्हायचं असेल त्यांनी जरूर मोठ व्हावं.  पण महाराजांच वाक्य तोडून मोडून दाखवून फुकटची प्रसिद्धी घेऊ नये. महाराज कीर्तनात समाजप्रबोधन करतात. कित्येक तरुणांची व्यसनमुक्ती केली. गावागावातील वराती बंद करून किर्तन चालु केली.  अनाथ मुलांसाठी 10 वी पर्यंत मोफत शाळा चालवतात.  राहिला प्रश्न महिलांचा तर स्त्री भ्रूण हत्या,  लेक वाचवा लेक शिकवा यासारख्या विषयावर कीर्तनातुन समाजप्रबोधन करत असतात हवं तर तुम्ही पूर्ण किर्तन बघू शकता.  आणखी एक मुद्दा तो म्हणजे पै़शांचा..  
काय करतात इंदोरीकर महाराज कीर्तनाचे पैसे
काही महाशय महाराज कीर्तनाचे 2-3 लाख रुपये घेतात असे T. V वर चर्चेत बोलले.  अशा सर्व लोकांना माझं आवाहन आहे कि त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं..  महाराज कधीच किर्तनाची रक्कम ठरवत नाही. लोक देतील ती रक्कम स्वीकारतात त्यातन 5 वी ते 10 वी पर्यंतच विद्यालय 1 रुपयाची फी न घेता चालवतात.  विनाअनुदानित शाळा असल्याने सर्व शिक्षकांचा पगार स्वतः करतात. अनाथ मुलांसाठी अनाथ शाळा चालवतात..यासारख्या अनेक समाज उपयोगी काम महाराज करत असतात.  तेव्हा उगच स्वतः मोठ होण्याच्या नादात महाराजांना बदनाम करू नका.


Comments