जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षण आरोग्य पेक्षा ज्यात कमाई आहे त्यात स्वारस्य
जालिंदर वाकचौरे
अहमदनगर ( प्रतिनिधी ):- जिल्हा परिषदेच्या मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांच्या सर्व्हे करून निर्लेखन पात्र इमारती ची यादी करून तातडीने तेथे शाळा खोल्या बांधाव्यात अशी मागणी भाजप चे जीप गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली.
भाळवणी ता पारनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत खोली ची भिंत कोसळली त्याला भेट दिली असता हे पदाधिकारी बालकांच्या जीवनाशी खेळणार असा आरोप त्यांनी केला
जिल्हा परिषद मध्ये अधिकारी व पदाधिकारी नको त्या गोष्टी वर खर्च करीत आहे त्यात अधिकारी, पदाधिकारी यांचे बंगले, विश्रामगृह, दौरे असल्या अनाठायी बाबीवर मोठा निधी खर्च करीत आहे मात्र शिक्षण, आरोग्य, पाणी याकडे उदासीनता दाखवत आहे. यामध्ये पैसे मिळतील असल्या गोष्टी त यांना स्वारस्य असल्याचा आरोपही वाकचौरे यांनी केला आहे.
भाळवणी येथील इमारत जुनी असून या संपूर्ण इमारतीचे निर्लेखन झालेले असताना तेथे विद्यार्थ्यांना बसवणे धोकादायक झाले आहे या शाळेचा पट चांगला असून येथे तातडीने इमारत होण्याची आवश्यकता आहे. येथे इंग्रजी माध्यमातून खाजगी शाळा आहे मात्र गावातील पालक आपले पाल्य यांना गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घालतात हा कौतुकास्पद निर्णय येथील ग्रामस्थांचा आहे अश्या ठिकाणी खास बाब म्हणून इमारत दिली पाहिजे.जेथे विद्यार्थी आहे तेथे खोल्या नाही अन जेथे खोल्या आहेत तेथे विद्यार्थी नाही अशी अवस्था जिल्हा परिषदेचे शाळांची पदाधिकारी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment