महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने पत्रकार यांना मदत
अहमदनगर ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने अकोले तालुका जिल्हा अहमदनगर येथील दैनिक लोकमत चे उपसंपादक रियाज सय्यद यांचे निधन झालेमुळे तर संगमनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गाडेकर यांना औषध उपचारासाठी 25 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतजी मुंडे व संघटक संजयजी भोकरे साहेब यांच्या संकल्पनेतून पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी हा उदात्त हेतूने राज्यभर कार्यक्रम राबविला जातो.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते अकोले येथे पत्रकार संघाचे कार्यालयात सय्यद यांचे बंधू राज सय्यद यांच्या कडे तर संगमनेर येथील विश्रामगृहात गाडेकर यांना धनादेश सुपूर्त केला.
यावेळी विश्वासराव आरोटे यांनी सांगितले की, जेवढे संघटनेचे सभासद आहेत. त्या सर्व सभासदांचा एक महिन्याच्या आतमध्ये मेडीक्लेम पॉलिसी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पत्रकारांना जी मदत लागेल ती सर्व मदत या पत्रकार संघाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मात्र तो पत्रकार संघटनेचा सभासद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीला काम करतांना खूप अडीअडचणी आल्या अनेकांनी नावेही ठेवली. पण तरीही आपण न डगमगता संघटनेसाठी काम करत राहिलो आहे. तुमच्यासारखे सर्व सभासद माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळेच मी आज राज्यभर फिरत आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य ३६ जिल्ह्यांमध्ये आहे. संघटनेचा एखादा पत्रकार आजारी पडल्यास त्यासाठी पत्रकार संघ मदत करत आहे. भविष्यात आपल्या सर्वांना एक दिलाने काम करायचे असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ताभाऊ उणवने, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राहाणे, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, पत्रकार दत्ता गाडगे, दत्ता जाधव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर शाखेचे अध्यक्ष सोमनाथ काळे, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले,उपाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, तालुका सचिव संजय गोपाळे, सदस्य राजू नरवडे, शेखर पानसरे, विकास वाव्हळ, बाबासाहेब कडू, संजय साबळे, भारत पडवळ, बाळासाहेब गडाख, अंकुश बुब आदी उपस्थित होते.
रियाज सय्यद ह्यांनी अनेक दैनिकात काम केले होते. त्यांचे कुटुंबीयांना मदतिचा हात देऊन पत्रकार संघाने खूप प्रेरणादायी कार्य केले आहे हे आमचे कुटुंबातील सदस्य कधीही विसरणार नाही असे भावनिक उदगार राज सय्यद यांनी काढले.
ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गाडेकर यांना काही दिवसांपुर्वी हृदयाच्या त्रासामुळे खासगी रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण पडला. सुखदेव गाडेकर यांना मदतीचा हात देऊन पंचवीस हजार रुपयांचा धनादेश दिला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य वाखाण्यासारखे आहे.
गोरक्ष मदने, संपादक दै नायक
Comments
Post a Comment