40 वर्षात काय झाले विचारणाऱ्यांना "ऊस तोडणी मजूर कारखान्याचा व्हा चेअरमन व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन झाला" पिचड यांचा टोला
40 वर्षात काय झाले विचारणाऱ्यांना "ऊस तोडणी मजूर कारखान्याचा व्हा चेअरमन व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन झाला" पिचड यांचा टोला
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने पुणेरी पगडी देऊन सत्कार
अकोले (प्रतिनिधी)- सीताराम पाटील गायकर यांच्या जिल्हा बँकेच्या पाच वर्षाच्या चेअरमन पदाच्या कालावधीत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने व शेतकऱ्यांना चांगली मदत झाल्याचे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी काढले.जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन व अगस्ति कारखान्याचे व्हा. चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे येथील श्रीमंत लॉन्स येथे काल सायं. त्यांचे जावई शिर्डी चे प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे व मुलगी सौ.संजीवनीताई शिंदे यांनी
आयोजन केले होते. यावेळी माजी मंत्री पिचड बोलत होते.
यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, योगी केशव बाबा, गायकर यांच्या मातोश्री दगडाबाई गायकर, पत्नी सौ.भीमाबाई गायकर, भाजपचे जिप गटनेते जालिंदर वाकचौरे,ज्येष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ वसंतराव मनकर, विजयराव वाकचौरे, सीताराम भांगरे, मच्छिन्द्र धुमाळ, सोन्याबापू वाकचौरे, पांडुरंग घुले, प्रकाशराव मालुंजकर, गुलाबराव शेवाळे,कचरू पाटील शेटे, रामनाथ वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, अशोकराव आरोटे,सुधाकर देशमुख,बाळासाहेब ताजने, आनंदराव वाकचौरे, भानुदास गायकर, सुरेश गडाख, सुनील दातीर, शरद चौधरी, भाऊपाटील नवले,रमेशराव देशमुख, बाळासाहेब वडजे, सौ.शारदाताई गायकर, सौ.कुमुदिनी पोखरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले की-
राजकारणात कुणाला वारसा लागत नाही,त्यासाठी कर्तृत्व, निष्ठा,विचार हे गुण कार्यकर्त्याच्या अंगी असायला हवे.सीताराम गायकर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असतांना त्यांनी तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या सारखे विनम्र पणे वागणारे व सर्वांना सोबत घेऊन काम करणारे कार्यकर्ते आपणास भेटले म्हणून मी स्वतःला नशीबवान समजतो,त्यामुळेच आपण तालुक्यात काही तरी काम करू शकलो अशी भावना पिचड यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांचे कडे गायकर यांनी पिंपळगाव खांड
धरणासाठी आग्रह धरला,अजितदादांनी ती मागणी पूर्ण केली,पिंपळगाव खांड धरण झाले, निळवंडे मार्गी लागले.तालुक्यात सर्व विभागात छोट्या- मोठ्या धरणांची निर्मिती झाली, वीज,रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले,गायकर यांचे सारखा खंबीर साथीदार व निगर्वी कार्यकर्ता मिळाला, त्यामुळे ही कामे होऊ शकली.तालुक्यात अजूनही धरणे करायची आहेत.
तालुक्यात अजून पाणी शिल्लक आहे, यापुढे पाहू ना कोण पाणी अडवितो . असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा घेतला.
अगस्ती कारखाना मधल्या काळात बंद पडला, त्यावेळी तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेला कारखाना सर्वांना सोबत घेऊन चालविला पाहिजे ही कल्पना सीताराम पाटील गायकर यांनी मांडली त्यास आपण सहमती दर्शवली. कारखाना सुरू केला. कारखान्यात इथेनॉल सारखा महत्वकांक्षी प्रकल्प साकारत आहे,कारखान्यात वेगवेगळ्या सुधारणा झाल्या.तालुक्यातील दूध संकलन वाढले.कै. भाऊसाहेब हांडे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून साथ केली त्यामुळे तालुक्यात सहकारी पतसंस्था, सोसायट्या, दूध संस्था निघाल्या.अकोले तालुक्यात सर्व पतसंस्थाच्या मिळून 1 हजार कोटी रुपयांच्या पुढे ठेवी आहेत असे सांगत माजी मंत्री पिचड यांनी अगस्ति कारखाना,दूध संघ व अन्य सहकारी संस्था नसत्या तर हे झाले असते का असा सवाल माजी मंत्री पिचड यांनी विरोधकांना केला.
माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तालुक्यातील सर्वच प्रश्नांना न्याय देण्याचे काम गायकर यांनी केले असल्याचे सांगितले.मोग्रस सारख्या गावातून त्यांनी कामाची सुरुवात केली.ऊस तोडणी मजूर,सोसायटी सेल्समन ते जिल्हा बँकेचे चेअरमन पदापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हंटले.
सत्कार मूर्ती सीताराम पाटील गायकर यांनी स्व.भाऊसाहेब हांडे व माजी मंत्री पिचड यांनी सामाजिक,राजकीय जीवनात आपणास घडविले अशी कृतज्ञता व्यक्त केली.पुरेसे शिक्षण नसतांनाही अमृतसागर दूध संघ,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी, महानंदा संचालक , जिल्हा बँक 15 वर्ष संचालक, व 5 वर्ष चेअरमनपद, अगस्ती कारखाना उपाध्यक्षपद आदी सर्व पदे दिली, सर्वच संस्थावर काम करण्याची संधी मिळाली,यापुढेही पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही सामाजिक,राजकीय काम करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.पिचड यांच्या आशीर्वादाने आपण कृतार्थ जीवन जगलो अशी भावना गायकर यांनी व्यक्त केली.
यावेळी आझाद युवा मंचचे अध्यक्ष विकासराव शेटे, बुवासाहेब नवले मल्टिस्टेट चेअरमन विक्रम नवले, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब रकटे, राज्याचे नगरविकास विभागाचे उपसचिव विजयराव चौधरी, आदींनी गायकर यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारी मनोगते व्यक्त केली.
स्वागत प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे, यांनी केले. प्रास्ताविक अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अशोकराव देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन पत्रकार अमोल वैद्य यांनी केले तर आभार अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब भोर यांनी मानले.
कार्यक्रमानंतर खासदार सदाशिव लोखंडे,महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने पुणेरी पगडी ,सन्मानचिन्ह,शाल पुष्पगुच्छ देवुन जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर,महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे ,अकोले पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य,संगमनेर मराठी पत्रकार संघाचे सचिव संजय गोपाळे अमोल शिर्के,ज्ञानेश्वर खुळे, यांनी गायकर यांचे अभिष्टचिंतन केले.
चौकट-
गायकर यांचे रूपाने आपणास चांगले कार्यकर्ते लाभले हे आपण आपले भाग्य समजतो,1972 च्या दुष्काळात मी सभापती असतांना मोग्रस ला पाझर तलाव व मुळा बांधणी साठी गायकर यांचा आग्रह होता. गेली 40 वर्षाच्या राजकीय, सामाजिक जीवनात निर्मितीचे काम केले.असे असतांना 40 वर्षात काय झाले विचारणाऱ्यांना गायकर यांचे सारखा ऊस तोडणी मजूर कारखान्याचा व्हा चेअरमन व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन झाले हे काम आपण केले असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
Comments
Post a Comment