सारथी साठी छत्रपती संभाजी राजे करणार उपोषण

सारथी संस्था वाचविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले स्वतः उपोषण करणार

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी फसवणूक केली

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अन काँग्रेस सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीच्या विरोधात आहे का???
छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले वाचा....
सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता. 
त्यानंतर , दुसऱ्याच दिवशी मी सारथी च्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजुन घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अशी कोणती घाई झाली आहे, की दररोज आदेश काढत आहेत?

 मला जाणीव झाली आहे की, लोकशाही मार्गाने या मनमानी विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. दिनांक- 11-01-2020 रोजी सारथी कार्यालयाजवळ शेकडो कार्यकर्ते आणि सारथी च्या लाभार्थ्यांसोबत बसणार आहे.


महाराष्ट्र चे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी) राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी 'सारथी' संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सारथी संस्थेतील अनेक वादविवाद समोर येत आहेत. सारथी संदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर त्वरीत बैठक घेवून यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले होते. 

#एक मराठा# #लाख मराठा#
चलो सारथी चलो सारथी 

शनिवार दि 11/01/2020 सकाळी 11:00
विद्यार्थी  युवक युवती यांचेसह लाक्षणिक उपोषण 

मराठा समाजाच्या सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक विकासासाठी असलेली सारथी 

हज़ारों मराठा युवक युवतिंचे भवितव्य घडविण्यासाठी निर्माण क़ेलेली सारथी

मराठा समाजात सामाजिक मागासले पण घालवुन प्रगतीचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी असलेली सारथी

मराठा युवक युवतीच्या डॉक्टरेट सुरक्षित करण्यासाठी असलेली सारथी

मराठा युवकाना नव्या शैक्षणिक संधी मिळवुन देण्यासाठी 
आधार असणारी सारथी 

मराठा समाजात प्रगतीचा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी असलेली सारथी

मराठा समाजात साहित्य पुस्तकांच्या माध्यमातुन वैचारिक प्रगल्भता ,आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी असलेली सारथी 

शाहू महाराज़ांचे चिरंतन स्मारक असलेल्या सारथी संस्था संपविन्याचा तीव्र निषेधासाठी  विद्यार्थी  युवक युवती यांचेसह लाक्षणिक उपोषण 

शनिवार दि 11/01/2020 सकाळी 11:00
चलो सारथी  चलो सारथी 
बालभारती समोर , लॉ कॉलेज रोड कॉर्नर , आघार इन्स्टिट्यूट शेजारी , सिम्बॉयसिस मागे पुणे
मी येणार, तुम्हीही या

Comments