श्री वरदविनायक गणेश मंदिरात श्री गणेश जयंती भक्तिमय वातावरणात साजरी
कोतूळ ( प्रतिनिधी ):- ता.अकोले येथील श्री वरदविनायक गणेश मंदिरात श्री गणेश जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली .चौदा विद्या व चौसष्ट कालांचा अधिपती असलेला गणपती याची जयंती माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी ला गणेश जयंती म्हणून ओळखले जाते.हा उसत्व माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो.
नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती असल्यामुळे माघी जयंतीचे निमित्त साधून मंगळवारी भाविकांनी मंदिरात पहाटे पाच वाजल्या पासून दर्शनाला गर्दी केली होती.पालखी सोहळ्या नंतर गर्दीत वाढ होत गेली त्या मुळे संध्याकाळच्या वेळी कोतूळ राजूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती.
पहाटे पाच वाजता भूपाळी वादना नंतर मंदिर भाविकांना खुले करण्यात आले.सकाळी सौ विमल व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब नानासाहेब देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व महापूजा करण्यात आली.दिवस भर वेदमूर्ती भाऊ जाखडी यांच्या नेतृत्वाखाली होम हवन व गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते.यात सौ.स्नेहल व दीपक राउत, सोनाली व राहुल वाघ,सुरेखा व राहुल भोजने, जयश्री व अनिल घरटे,व्दारका व संभाजी पोखरकर हे भाविक सपत्नीक सह भागी झाले होते.
संध्याकाळी पालखी सोहळ्याची ग्रामप्रदक्षिणा झाल्या नंतर अकोल्याचे प्रधान न्यायाधीश सचिन खाडे व सह दिवाणी न्यायाधीश सुदाम काळे,महावितरण चे उपकार्यकारी अभियंता सुनील राऊत यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली.वरदविनायक देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी त्यांचा सन्मान केला.या वेळी वकील सदानंद पोखरकर,महावितरणचे सहाय्यक अभियंता संदीप काकड,पुरषोत्तम परशुरामी दत्तात्रय दुटे, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख,सोमदास पवार,डॉ. सुभाष सोमण, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब देशमुख,प्रदीप नेवासकर, माजी सरपंच रमेश भुजबळ,सीताराम राऊत,रमेश देशमुख,माजी सरपंच रमेश घाटकर,रवींद्र आरोटे,संतोष चोथवे,शरद बनोटे,आदींसह भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते. या वेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यात भोजना बरोबर प्रसाद म्हणून अकरा हजार मोदकांचे वाटप भाविकांना करण्यात आले.रात्री दत्त सेवा व रेणुकामाता मंडळ यांच्या वतीने हरी जागर करण्यात आला.
मंदिर परिसरात भव्य मंडप टाकून आकर्षक विधुत रोषणाई करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध पिण्याचे पाणी,अभिषेक व्यवस्था,देणगी कक्ष,महाप्रसाद आदी व्यवस्था करण्यात आल्या होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप भाटे,संभाजी पोखरकर,वासुदेव साळुंके,गणेश गिरे,उत्तम देशमुख,तुकाराम आरोटे,विशाल बोऱ्हाडे,निवृत्ती पोखरकर,मुकुंद खाडे, दीपक राउत,विनय समुद्र,अजित दिघे,माजी उपसरपंच गणेश पोखरकर,कुलदीप नेवासकर,अनिल पाठक,सचिन पाटील अविनाश गिते,स्वप्नील देशमाने,प्रकाश पोखरकर,विजय वैद्य,बंडू परशुरामी,भाऊसाहेब गिते,अरुण देशमाने, अनिल खरात,संतोष नेवासकर,श्रीकांत गायकवाड,दादासाहेब पवळे,सचिन आरोटे, व जय भवानी संकृती संवर्धन मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.
Comments
Post a Comment