माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी विरोधकांवर चढविला हल्ला

आज तालुक्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांची चर्चा असून ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या. 

मागील काळात पंचायत समितीमध्ये दरोडे टाकण्याचे काम झाले आता समाजासाठी काम करा 

४० वर्ष काय केले म्हणणारे नी मी केलेले रस्त्यावर चे  फक्त खड्डे बुजवून दाखवा
:- मधुकरराव पिचड

अकोले ( प्रतिनिधी ) :-आज तालुक्यात पक्ष सोडून जाणाऱ्यांची चर्चा असून ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या. मी एकटा राहिलो तरी पुन्हा उभं करील, माझ्यावर कितीही टीका पण माझ्या छोट्या कार्यकर्त्यावर टिका कराल तर खबरदार असा सज्जड दम दिला माजी मंत्री तथा भाजपचे नेते मधुकरराव पिचड यांनी दिला.
        
        केळी ओतूर येथे पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे उपसभापती दत्तात्रय देशमुख यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर हे होते. यावेळी अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, गिरजाजी जाधव, सिताराम देशमुख, सखाराम सारोक्ते, पंचायत समितीचे सदस्य सौ सीताबाई गोंदके, माधवी जगधने, सारिका कडाले, उर्मिला राऊत, नंदा कचरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सुरेश लोखंडे, सोनाली नाईकवाडी, सी बी भांगरे, कैलास शेळके, रमेश शेंगाळ, रामनाथ भांगरे,  भरत देशमाने, राजेंद्र देशमुख, गणेश पोखरकर, सोमदास पवार, बाळासाहेब सावंत, लक्ष्मण कोरडे आदी उपस्थित होते.



         नरेंद्र मोदीनी विकासाचे व्हिजन सुरू केलेले असून २०२२ पर्यंत तालुक्यातील सर्व व्यक्तींना घरकुल, पिण्याचे पाणी,वीज , ग्यास देण्याचे काम करा, मागील काळात पंचायत समितीमध्ये दरोडे टाकण्याचे काम झाले आता समाजासाठी काम करण्याचा सल्ला नूतन सभापती, उपसभापती यांना माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी दिला. 
            विधानसभा निवडणुकीत चाळीस वर्षात काय केले असा अपप्रचार करून जनतेला भुलविण्याचे काम झाले १९७२ च्या दुष्काळात पाझर तलाव, रस्ते करण्याचे काम केले. शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी देण्याचे काम केले ५५६ आश्रमशाळा बांधल्या, आदिवासी समाजाचे वेगळे बजेट निर्माण केले. २००० साली प्यासा चा कायदा केला. कोळी महादेव व महादेव कोळी एकच असल्याचे सुप्रीम कोर्टात सिद्ध केले म्हणून सर्व समाज वाचविला. मी ४० वर्ष काय केले म्हणणारे नी मी केलेले रस्त्यावर चे  फक्त खड्डे बुजवून दाखवा असे आव्हान ही श्री पिचड यांनी दिले. खोट बोलण्याचा आपला धंदा नसून शेतकऱ्यांनचा ७/१२ कधी कोरा करणार, तोलारखिंडचा नारळ कधी फोडणार, खरचोडी, फोफसंडी, खेतेवाडी, केळी येथील धरणे बांधून दाखवा, युवकांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसी कधी करणार असाही सवाल त्यांनी विचारला आहे. 
        वैभवराव पिचड यांनी अर्ध्या हळकुंडानी पिवळ्या झालेल्या पुढार्यांनी आज तालुक्यात सुरू असलेले विकास कामेची मंजुरी कधीची आहे याची माहिती घ्या. संक्रांतीच्या दिवशी वाण महिला वाटतात ती वस्तू वापरताना देणाऱ्या ची आठवण येते मात्र तालुक्यात अनेक विकास कामाचे वाण वाटले परंतु त्याची आठवण जनतेला आली नसल्याची खंत व्यक्त केली.

      यावेळी काशिनाथ साबळे, सुरेश भांगरे, पांडुरंग कचरे, गंगाराम धिंदळे, सदाशिव कचरे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुभाष वायाळ, प्रास्ताविक किसन शिरसाठ यांनी केले सूत्रसंचालन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर आभार सरपंच गणेश वायाळ यांनी मानले.


Comments