गणेश जयंती निमित्त कोतुळ मध्ये विविध कार्यक्रम

कोतुळ येथे गणेश जयंती निमित्त अकोल्याचे प्रधान न्यायाधीश सचिन खाडे व सहदिवाणी न्यायाधीश सुदाम काळे यांच्या हस्ते महाआरती 
       कोतूळ ( प्रतिनिधी ):- ता.अकोले येथील पुरातनकालीन व इच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री वरदविनायक मंदिरात जयभवानी संकृती संवर्धन मंडळ व श्री वरदविनायक देवस्थान कोतूळ यांच्या वतीने गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
      यंदाचा गणेश जन्मोत्सव मंगळवार २८ जानेवारी ला असून गणेश जयंतीनिमित्त पहाटे भूपाळी गायन,सकाळी सौ विमल व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब नानासाहेब देशमुख यांच्या हस्ते  अभिषेक व महापूजा व त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत   वेदमूर्ती नरेंद्र जाखडी यांच्या नेतृत्वाखाली गणेश याग,सायंकाळी भव्य पालखी सोहळा, संध्याकाळी साडेसात वाजता अकोल्याचे प्रधान न्यायाधीश सचिन खाडे व सह दिवाणी न्यायाधीश सुदाम काळे यांच्या  हस्ते महा आरती व नंतर महाप्रसाद (भंडारा) यात भोजना बरोबर अकरा हजार मोदकांचे वाटप महिला वर्गा मार्फत करण्यात येणार आहे.रात्री दत्तसेवा भजनी मंडळ,व रेणुकामाता भजनी मंडळ यांच्या  भजनाचे  आयोजन  करण्यात आले आहे. 
      नवसाला पावणारा गणपती म्हणून हा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.दर मंगळवारी व चतुर्थीला भाविक गणपतीला कौल लाऊन नवीन कामाची सुरवात करतात. या वर्षी मंगळवारी गणेश  जयंती असल्याने तीला विशेष महत्व आहे.सध्या मंदिराच्या जीर्निधाराचे काम सुरु असून भाविकांसाठी विविध सोई करण्याचा देवस्थानचा प्रयत्न आहे.भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री वरदविनायक देवस्थान व जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने अध्यक्ष प्रदीप भाटे, प्रा.संभाजी पोखरकर, गणेश गिरे ,तुकाराम आरोटे,विनय समुद्र,वासुदेव साळुंके,मुकुंद खाडे,संतोष नेवासकर,आशुतोष घाटकर,विजय तोरकडे,उत्तम देशमुख,सचिन पाटील,विशाल बोऱ्हाडे,विजय वैद्य, दीपक राउत,कुलदीप नेवासकर,निवृत्ती पोखरकर अविनाश गिते,गणेश आरोटे,भाऊसाहेब गिते,आकाश तोरकडे,अजित दिघे,गणेश पोखरकर,आदींनी केले आहे.

Comments