प्रवरा नदी चे पाहिले आवर्तन सुरू
अकोले (प्रतिनिधी ) प्रवरानदी लाभ क्षेत्रातील शेती साठीचे पाहिले आवर्तन काल २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता १५०० क्युसेस ने रब्बी हंगामा साठी निळवंडे धरणातून सोडण्यात आले अशी माहिती जलसंपदा विभागाचे उपअभियंता गणेश हारदे यांनी दिली.
यावेळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठी १०८३० दलघफू तर निळवंडेचा पाणीसाठा ७९१२ दलघफू होता. सुमारे २५ दिवसाच्या या आवर्तनात अंदाजे अडीच ते तीन हजार दलघफू पाण्याचा वापर होणे अपेक्षित असल्याचे हारदे यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment