प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित सौ सखुबाई वाकचौरे

जिल्हा परिषद चा "प्रगतशील शेतकरी पुरस्कार" कळस येथील सौ सखुबाई वाकचौरे यांना प्रदान
संगमनेर ( प्रतिनिधी )जिल्हा परिषद अहमदनगर च्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या वतीने प्रगतशील शेतकरी पुरस्कार कळस येथील सौ सखुबाई पुंजा वाकचौरे यांना प्रदान करण्यात आला
      संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात राज्याचे महसूलमंत्री ना बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ सुधीर तांबे, जिप उपाध्यक्ष प्रतापराव शेळके,जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, जीप सदस्य मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे, भाऊसाहेब कुटे, रमेश देशमुख,  सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
               प्रगतशील शेतकरी हा पुरस्कार कळस येथील सखुबाई वाकचौरे  पती पुंजा वाकचौरे या उभयतांनी व सून सविता वाकचौरे यांनी स्वीकारला. शेतीच्या माध्यमातून आपला प्रपंच फुलविण्याचे काम या आदर्श मातेने घडविला. कोरडवाहू शेती बागायती करून कांदा पीकाचे विक्रमी उत्पादन घेतात. सखुबाई ह्या खरे तर बिडी कामगार होत्या विडी कामगार चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. विडी कामगारांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगला आहे. आपली शेती विकसित झाली पाहिजे हे ध्येय साध्य करण्यासाठी विडी उद्योग बंद केला. शेती सुरू केली माळरानावर असलेल्या जिरायती जमिनीचे सपाटीकरण करून विहीर खोदून बागायत जमीन केली नदी वरून पाईपलाईन केली. कांदा, गहू, ऊस, बाजरी, यासारख्या पिकातून आपला प्रपंच उभा केला. शेतीबरोबरच जोड धंदा म्हणून पशुपालन सुरू केले. सून सविता च्या मदतीने आपली शेतीला आधुनिक तेचि जोड दिली. 
         आपला प्रपंच सुधारला पण आपल्या बरोबर शेतीत काम करणारा आदिवासी ठाकर समाजाचा वाटेकरी सुधारला पाहिजे त्याचा प्रपंच उभा राहिला पाहिजे यासाठी त्याच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर केले व आपल्या जमिनीत एक गुंठा त्याला बक्षीस दिला याचे सर्वत्र कौतुक झाले होते
            यामुळे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी  जिल्हा परिषद चा आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार सखुबाई वाकचौरे यांना देण्याची शिफारस केली तर  कृषी अधिकारी कोष्टी, रामराव कडलग, शेवाळे यांनी मदत केली.

             

Comments