धर्मवीर आनंद दिघे यांना जयंती निमित्ताने आदरांजली
सिनेअभिनेत्री भक्ती धुमाळ, सिनेअभिनेता ऋत्विक केंद्रे ची उपस्थिती
अकोले (प्रतिनिधी ):- धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीअम स्कूल आनंद गड वीरगाव ता.अकोले येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब जयंती उत्सव साजरा होत आहे.यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवात प्रथम सिने अभिनेत्री भक्ती धुमाळ,सिने अभनेता ऋत्विक केंद्रे,निर्माता मच्छिंद्र धुमाळ, प्रविण शेठ धुमाळ, डॉ.सुजित खिलारी,संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे,सचिव अनिल रहाणे आदींनी दिघे साहे बांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व आदरांजली वाहिली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी
आज जयंती उत्सव निमित्ताने ग्रामस्थांच्या उपस्थितीत आदरांजली कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत
Comments
Post a Comment