भारतीय जनता पार्टी अकोले तालुकाध्यक्षपदी सिताराम पाटील भांगरे यांचा जीवनपट
अकोले:- ( सुनील उगले )
अकोले तालुक्याला पुरोगामी विचारांची मोठी परंपरा आहे तशी गतिशीलता,सर्वसामावेशक धोरणांच्या विचारधारेची देदीप्यमान परंपरा आहे तालुक्याला आजवर अनेक नेते मिळाले त्यात अविचल, लढाऊ, आणि लोकाभिमुख नेतृत्व भारतीय जनता पार्टीला अकोले तालुक्यासाठी लाभले. ज्यांच्याकडे आदराने पाहीले जाते ते मा.श्री सिताराम भांगरे पाटील. पारदर्शी,अभ्यासु वृत्ती,धोरणी विस्तारक,प्रामाणिक व्यक्ती,काम करणार फक्त पक्षासाठी,जनतेच्या हितासाठी, आणि कार्यकर्त्यांसाठी स्वच्छ चारीत्र्याचे कुशल राजकारणी, वाकचातुर्य, बाणेदारणा, जिद्द, तत्वनिष्ठा हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये या जोरावर त्यांनी माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनावरती अधिराज्य निर्माण केले आहे. असा नेता प्रत्येक पक्षाला हवेहवेसे वाटणारे सर्वसामावेशक गुण या नेत्यात ठासुन भरलेले आहे अव्हानें पेलणार हे नेतृत्व होय
अकोले तालुक्यातील दुर्गम डोंगराळ अश्या मनोहरपूर गावात २१जुलै १९५८ रोजी गरीब व आर्थिक परिस्थितीत बेताची असणाऱ्या भांगरे परीवारात जन्मास आले आई मुकी व वडील शेतकरी अशी घरची परिस्थिती होती. चुलते संताजी भांगरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी जोडलेले होते. महात्मा गांधी खून प्रकरणात संताजी भांगरे यांना अटक झाली होती त्यामुळे संघाचे बाळकडू घरातूनच होते. शिक्षण कसे बसे करीत नोकरी साठी मुंबई गाठली मात्र तेथेही संघाचे शाखेत जायला सुरवात केली. संघाचे काम करत असतानाच १९७४ ते ७८ सायं शाखा घाटकोपर येथे मुख्य शिक्षक संघ शाखेत म्हणुन नियुक्ती झाली १९७८ते८०-कार्यवाहक या पदावरती सेवा बजावली १९८०ते ८२ शाररिक शिक्षण प्रमुख नियुक्त झाली १९८२ते८३ बेलापुर विस्तारक, १९८३ते८५ वर्तकनगर मंडळ कार्यवाहक. १९८५ते८६संघ प्रदेश समिती सदस्य, १९८६ते८८संघ कार्यवाहक,असे संघाच्या विविध जबाबदारी त्यांनी अतिशय सक्षम पणे पार पाडली.
मुंबई येथे नोकरी निमित्ताने स्थायिक झालेले भांगरे यांना वडिलांच्या निधनानंतर आपल्या गावी यावे लागले. नेतृत्व गुण असलेले सिताराम भांगरे यांनी दुष्काळी असणारे मनोहरपूर गावातील युवकांची एक टोळी बनवली. मनोहरपूर पासून तीन किलोमीटरवर प्रवरा नदी होती परंतु मनोहरपूर या पाण्यापासून वंचित होते परंतु प्रवरा काठावरच्या गावांनी पाणी उचलायला सुरुवात केली होती या टोळी च्या माध्यमातून शेतकऱ्यांन च्या पाईपलाईन चे काम व चर खोदून देण्याचे काम सुरू झाले
नाशिक लोकसभा मतदारसंघात असणारे अकोले तालुका भारतीय जनता पार्टीला लढवायला आला अन मग येथे कोण कार्यकर्ता आहे असा शोध सुरू झाला त्यावेळी मुंबई वरून संघाला भांगरे चा शोध लागला होता त्यांनी तालुक्यात संघाचे काम ही सुरू केले होते मग मात्र त्यांचे वर पक्षाची जबाबदारी देण्याचे निश्चित केले.अकोले तालुका आदिवासी असले कारणाने पार्टी ने मारुती गभाले अध्यक्ष व भांगरे सरचिटणीस अश्या पद्धतीने पक्षचे स्थापना तालुक्यात केली. डाव्या चळवळी, पुरोगामी विचार सरणीचा या तालुक्यात भाजपचे कमळ फुलविणे म्हणजे खडकावर डोकं अपटण्या सारखे होते. त्यात काँग्रेस चे नेते मधुकरराव पिचड यांचे राजकीय कारकीर्द ला बहर आला होता. पहिल्या झटक्यात तालुकाध्यक्ष सहा महिन्यात काँग्रेस मध्ये दाखल झाला अन मग पक्षाने तालुका अध्यक्ष पदाची धुरा सिताराम भांगरे यांच्या खांद्यावर दिली. १९८८ते १९९४ तालुका अध्यक्ष म्हणून कार्य करीत भाजप हा भट, ब्राम्हण चा पक्ष बहुजन मध्ये पोहोचविला. त्यानंतर १९९५ते९९किसान मोर्चा जिल्हाअध्यक्ष १९९९ते२००१ युवामोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य २००१ते२००४ पुन्हा किसान मोर्चा जिल्हाअध्यक्ष २००४ते०७ किसान मोर्चा प्रदेश कार्यकरणी सदस्य २००७ते११ जिल्हा कार्यकरणी सदस्य.२०११ते१५ प्रदेश परिषद सदस्य.२०१५ला पुन्हा तालुका अध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली. २०१५वृद्ध साहित्य कलाकार मानधन अध्यक्ष असे त्यांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर अनेक पदावरती काम केलीत व त्या पदांना कामाच्या माध्यमातुन न्याय दिला. राष्ट्रीय संवसेवक संघाच्या शिस्तबद्ध शिक्षणातुन त्यांच्यातील नेता घडत गेला.ज्या तालुक्यात भाजपची अवस्था चार गडी आणी एक गाडी अशी असताना कुठेही अकोले तालुक्यात पक्षाचा मागमुस नसताना व कमनिष्ठ,राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना त्यांनी राजेद्र धारणकर, रामेश्वर मुदंडा, मारुती गभाले, गोपाळराव गभाले गुरुजी, दौलत अण्णा देशमुख , नंदकुमार विसाळ, जालिंदर वाकचौरे, रमेश राक्षे,भाउसाहेब वाकचौरे मच्छिंद्र मंडलिक जुन्या नव्या दमाच्या शिलेदारांना साथीला घेत अकोले तालुक्यात भाजपची पायाभरणी केली तालुक्यात कम्युनिष्ठ, कॉग्रेस, राष्ट्रवादी यांना पर्याय तसेच मित्र पक्ष शिवसेनेला सोबतीला घेत तसेच जिल्ह्यातील वजनदार नेते पालकमंत्री मा.श्री.राम शिंदे, दिलीपजी गांधी, जिल्हाअध्यक्ष प्रा. भानुदास बेरड सर, मा.श्री.जालिंदरभाउ वाकचौरे यांच्या सहकार्य, पाठबळावर प्रस्थापितांना टक्कर देत माळरानावर कमळ फुलवले व भाजप प्रबळ केला यात भांगरे याचा मोलाचा वाटा आहे.त्यांनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्यांना कार्यरत ठेवल्याने त्याचा परीपाक गेल्या लोकसभा व विधानसभा या निवडणुकीत भाजपला अभुतपुर्व यश मिळाले त्यावरती तर जिल्हा परिषद व पचांयत समीती निवडणुकीच्या रुपाने पाहावयास मिळाला त्यांनी तिन जिल्हापरिषद सदस्य तर चार पंचायत समीती सदस्य जिंकून 100% निकाल घेतला. जनतेचा विश्वास व कार्यकत्यांचा पाठीब्याच्या जोरावर. या सर्व जडनघडणीत भांगरेसाहेब आजही आहे तसेच आहे कुठल्याही प्रकारे पदाचा मोह नाही पैशाची हाव नाही. इतर राजकीय पाठीमाघुन आलेली माणसं पदाच्या जोरावरती कुठल्या कुठे आर्थिक सुबत्ता कमाऊन बसली व गायबही झाली पण ते आजही आपला साधेभोळापणा तसाच टिकऊन आहे तसेच प्रचंड प्रामाणिकपणा असल्याने आजही आर्थिक परीस्थिती सर्वसाधारण कुठेही लबाडीचा लवलेश नाही सत्याचा धडधाकट मार्ग अवलंबीत असल्याने त्रास कष्ट हेच सखेसोबती आजही कार्यालयात, प्रवासात घरचा डब्बा खाणारे भांगरे बाबा. ज्याप्रमाणे देशातील तरुण नरेंद्र मोदीजी यांचे काम पाहुन आकर्षित होत आहे त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील तरुण सिताराम भांगरेच काम पाहुन भाजमय होत आहे त्यांची पक्षाबद्दल असणारी निष्ठा, प्रामाणिकपणा आमच्यासारख्या तरुण कार्यकत्यांना कायम प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरत आहे.सामाजिक प्रश्नांचा असलेला अभ्यास,प्रश्न मार्गी लावण्याची धडपड,धडाडी,आणि इच्छाशक्ती आदी गुणांव्दारे सगळ्यांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले.
अकोले तालुक्याच्या राजकीय इतिहासात मोठी घटना घडली महाराष्ट्र राज्य चे आदिवासी समाजाचे मोठे नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब व त्यांचे पुत्र आमदार वैभवराव पिचड यांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला अनेक वर्षे ज्यांचे बरोबर राजकीय संघर्ष केला त्यांना प्रवेश दिला त्यांनचे निवडणूक कामात झोकून देऊन काम केलं त्यांना सुद्धा भांगरे च प्रामाणिक काम भावलं त्यांची निर्णयक्षमता प्रशासनावरती वचक यामुळे त्यांचे नेतृत्व तालुक्यानेच नाही तर जिल्ह्यानेही दखल घेण्यास पात्र ठरले ते फक्त पक्षासाठी दिलेला त्याग, वेळ, प्रामाणिकपणा, निष्ठा या जोरावर आशा आहे स्वयंभु घडलेल्या या नेतृत्वाखाली तालुक्यातील सत्ता परिवर्तन घडावे व भाजपमय कमळ फुलावे ही अपेक्षा त्यांची पुर्ण व्हावी तसेच या नेतृत्वाची दखल यापुढेही पक्षाकडुन घेतली जावी व आजपर्यंतच्या प्रामाणिकपणाची अजुन फार मोठी भेट त्यांना मिळो हीच सदिच्छा..!
कै. सूर्यभान पाटील वाहडणे, कै. प्रा. ना.स.फरांदे सर यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अटलजी च्या विचारावर व नरेंद्र मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवून त्यांचे काम सुरू आहे. पालकमंत्री राम शिंदे त्यांचा उल्लेख फक्कड अध्यक्ष असा करतात. मधुकरराव पिचड हे प्रामाणिक कार्यकर्ता असे गौरवितात. दिलीप गांधी च्या अनेक निवडणूक ची धुरा त्यांनी सांभाळली आहे. पक्षाचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक खास विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांचा उल्लेख करतात.
भारतीय जनता पार्टीच्या 2020-23 साला च्या साठी त्यांची पुन्हा तालुकाध्यक्ष पदी निवड सर्वानुमते झाली ही त्यांच्या प्रामाणिक कार्याची पावती च आहे.
Comments
Post a Comment