गोरक्ष नेहे यांना संगमनेर उपविभागाचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार २०१९

श्री. गोरक्ष नेहे यांना संगमनेर उपविभागाचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार २०१९ 
संगमनेर:- तालुक्यातील सावरगाव तळ येथील पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना संगमनेर उपविभागाचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार २०१९ या वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल चा पूरस्कार प्रांत अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
      संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात मैदानावर मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडगे, नायब तहसीलदार सुधीर सातपुते, सुभाष कदम, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार, सहायक पोलीस निरीक्षक कादरी, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ  आदी मान्यवर उपस्थित होते.
        नेहे यांनी  २०१९ या वर्षात गावपातळीवर विविध शासकीय उद्दिष्ट व जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच गावात पाणलोट विकास, वृक्षारोपण, लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत संपन्न करण्यासाठी प्रशासनास विशेष सहकार्य गावात दारूबंदी साठी विशेष प्रयत्न, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, निवडणूक प्रशासन, ग्रामस्वच्छता, आरोग्य शिबिरे, कृषी मार्गदर्शन शिबिरे याबरोबरच गावात विविध शासकीय योजनेचे विशेष शिबिरे आयोजित करून गावपातळीवर शासन प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे .

Comments