ग्रामीण भागातील पत्रकारांनी वार्तांकन करताना बातमीच्या विश्वासर्हतेला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी :- जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर
। अहमदनगर । प्रतिनिधी ।
पत्रकारीतेची परिणामकारकता त्याच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असते. विश्वासार्हता पत्रकारीतेचा आत्मा आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांनी वार्तांकन करताना बातमीच्या विश्वासर्हतेला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जेष्ठ पत्रकार तथा निवृत्त प्राचार्य प्रकाश टाकळकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अकोले शासकीय विश्रामगृहावर आयोजित दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सचिव विश्वास राव आरोटे यांच्या संकल्पनेतून सर्व पत्रकारांचा गौरव शाल, पुष्पगुच्छ, वही ,पेन, भेटवस्तू देऊन करण्यात आला
श्री. टाकळकर पुढे म्हणाले की, गत 25 ते 30 वर्षात ग्रामीण पत्रकारीतेमध्ये मोठा बदल झाला आहे. पुर्वी वृत्त पत्रातील छापील शब्दांवर विश्वास होता. पण अलीकडे छापील शब्दांचा विश्वास कमी होवू लागला आहे. त्यामुळेच वृत्तपत्रांत्री परिणामकारकताही पुर्वीसारखी राहीलेली नाही, असे आढळते. या बाबत पत्रकारांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. ग्रामीण पत्रकारांना अतीशय प्रतीकूल परिस्थितीत काम करावे लागते. विविध अडचणींचा सामना करीत प्रभाव, वादाला तोंड देत काम करीत असतात. तंत्रज्ञानातील बदलामुळे पुर्वीच्या तुलनेत काही बाबतीत पत्रकारीता सुसहय झाली असली तरी आज सोशल मिडीयामुळे बातमीदारांपुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे. त्यामुळे पत्रकारीतेतही बदल करणे आवश्यक बनले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पत्रकारांनी आपला व्यासंग वाढविणे, सामान्य माणसाला भेडसवणार्या वेगवेगळया विषय बातमीदारीत आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपिठावर विजय पोखरकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे, किसन शेवाळे, भाऊसाहेब मंडलिक, जादुगार पी. बी. हांडे, संघाचे तालुकाध्यक्ष अशोक उगले आदींनी मनोगते व्यक्त केले.
यावेळी पत्रकार अमोल वैद्य, रामलाल हासे, जगन आहेर, दत्ता हासे, दत्ता जाधव, प्रविण धुमाळ, सुनिल शेणकर, अजित गुंजाळ, अनिल नाईकवाडी, सुभाष खरबस, अमोल शिर्के, सचिन खरात, संजय शिंदे, राजू जाधव, हेमंत आवारी, अल्ताप शेख, गणेश रेवगडे, सुनिल आरोटे, निखिल भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर सुत्रसंचालन विद्याचंद्र सातपुते यांनी केले. आभार अनिल रहाणे यांनी मानले.
Comments
Post a Comment