दारू नको,दुध प्या
जादुगार पी.बी.हांडे सोशल फाउंडेशन चा आदर्श उपक्रम
अकोले ( प्रतिनिधी ):- जादुगार पी.बी.हांडे सोशल फाउंडेशनच्या वतीने व्यसनविरोधी मोहीम दरवर्षी राबविण्यात येते. यंदा दारू नको दूध प्या असा स्तुत्य व आदर्श व अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
जादुगार पी.बी. हांडे सोशल फाउंडेशन, देवराम पुंजा आरोटे वाचनालय,व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २०२० च्या पूर्वसंध्ये ला सायंकाळी सहा वाजता शिवाजी नगर, अकोले, जिल्हा अहमदनगर येथे अकोले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात मान्यवरांनी दारूचे दुष्परिणाम सांगुन संस्काराचे कसे वाटोळे होते, मानहानी होते, आयुष्य कमी होते, दुध आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे, म्हणुन दुध पिण्याचे आवाहन करण्यात आले. सदर प्रसंगी उपस्थित समुदायाला दुध वाटप करण्यात आले. सुजान नागरिकांनी या व्यसनविरोधी मोहीमेत सहभागी होऊन व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष जादुगारपी. बी. हांडे यांनी केले.
सदर स्तुत्य उपक्रमास जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, मनोहर तळेकर,प्रा. एस. टी. चासकर, एस.आर.शेटे, डॉ.दगडू भोर, ए.बी देशमुख, डॉ.सुधाकर आरोटे,राम तळेकर,ऊत्तम धुमाळ,संतु भोर, साहेबराव गायकवाड,भास्कर तळेकर, शेटे सर इ. मान्यवरासोबत परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment