कर्नाटकच्या निकाला नंतर पंतप्रधान मोदींनी शिवसेनेला दिला हा इशारा..
मुंबई ( प्रतिनिधी ):- कर्नाटकामध्ये पार पडलेल्या पोटनिवणुकीत काँग्रेसला धुळ चारत भाजपने कर्नाटकातील सरकार टिकवले आहे . १५ जागांसाठी निवडणुक झाली होती.त्यातील १२ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे विजयाचा कौल मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला.संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता धडा शिकवते अशा शब्दात नरेंद्र मोदीं यांनी शिवसेनेला टोला लगावला.
कर्नाटकातील निकाल हा देशातील सर्वच पक्षांना एक संदेश देणारा आहे . जर कोणी फायद्याचे राजकारण करत असेल तर जनता त्यांना धडा शिकवते हे यातुन दिसत आहे . लोकांना फसवणाऱ्या लोक लक्षात ठेवतात . हा इशारा शिवसेनेला होता असे सर्वत्र बोले जात आहे.
कर्नाटकात आता आम्ही स्थिर व मजबूत सरकार देणार आहोत . तसेच त्यांनी काँग्रेस हा स्वार्थासाठी आघाडी व जनमताचा वापर करतो असा आरोप मोदी यांनी काँग्रेस वर केला . व यामुळे लोकांचे प्रश्न सुटत नाहीत व लोकांचा विकास करण्यात आढतळा येतो असे ते म्हणाले.
त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात जर पोटनिवणुका झाल्या तर भाजपचे सरकार येईल असा इशाराच मोदी यांनी दिला आहे असे बोले जात आहे . त्यामुळे आता शिवसेना काय उत्तर देते हे पाहणे खुप महत्वाचे ठरेल..
Comments
Post a Comment