नागरिकता संशोधन बिलाचे निमित्त त्याच्या समर्थनार्थ अमित शहा यांचे झालेले भाषण!

ऐतिहासिक चुकांची दुरुस्ती :: नवीन अध्याय!
आज लोकसभा पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाची साक्षी दार बनली!
 नागरिकता संशोधन बिलाचे. निमित्त त्याच्या समर्थनार्थ अमित शहा यांचे झालेले भाषण!

दिल्ली ( विशेष प्रतिनिधी )
१) धर्माच्या आधारावर या देशाची फाळणी कुणी केली ? त्याला कुठले नेतृत्व जबाबदार होते? जर हे विभाजन धर्माच्या आधारावर झाल्यामुळे या विधेयकाची आवश्यकता निर्माण झाली.
२) मुस्लिम का वगळले ? कारण याचे उत्तर देताना ते म्हणाले बंगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्थान यांची घटना इस्लामिक आहे. ही मुस्लिम राष्ट्रे आहेत आणि यात हिंदू ,ख्रिश्चन , बौद्ध, शीख हे सर्व अल्पसंख्यांक आहेत. पुढे जाऊन यात संसदेसमोर पहिल्यांदा आकडेवारी पुढे आली ज्यात एकीकडे या तिन्ही देशात अल्पसंख्यांक कमी झाले पण भारत असा देश आहे यात बहुसंख्यांक लोकसंख्या कमी झाली आणि अल्पसंख्यांक लोकसंख्या वाढली? या आकडे वारीला कुणाकडे उत्तर नाही!
३) नेहरू लियाकत करार : १९५० साली झाला. आपल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षितता देण्याचा करार होता तो पण प्रत्यक्षात तो अपयशी ठरला आणि २४ टक्के गैर मुस्लिम लोकसंख्या तीन टक्क्यांवर आली आणि बांगला देश मधील गैर मुस्लिम लोकसंख्या २३ टक्यावरून सात टक्क्यांवर आली म्हणून च विधेयकाची गरज!
४) घटनेतील आर्टिकल १४ चा संदर्भ निरुपयोगी ठरला कारण हे विधेयाक केवळ एका विशिष्ट धर्मासाठी नाही तर सर्व गैर मुस्लिम शरणार्थी यांच्यासाठी आहे.
५) मोठ्या मानभवीपणे टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांची नावे घेणाऱ्यांना जेंव्हा अमित शहा नी दुर्गा पूजेसाठी कोर्टात जाण्याचे या महापुरुषांनी कधी स्वप्न बघितले होते का ? या प्रश्नाला टी एम सी ना उत्तर देवू शकले ना प्रती प्रश्न विचारू शकले!
६) एकाच वेळेस शिवसेना आणि मुस्लिम लीग दोघांबरोबर युती करणाऱ्या काँग्रेसची विचारधारा कोणती या प्रश्नाने अमित शहा नी सर्व काँग्रेस मंडळी ना घायाळ करून टाकले.
७) अफगाणिस्तान मधील तालिबानी अत्याचार आणि मूर्ती भंजन संसद सभागृहात  त्यांनी स्पष्टपणे मांडले.

भाऊसाहेब वाकचौरे पाटील

Comments