गड किल्ल्यांचे पावित्र्य राखा संस्कृती रक्षक दलाचे आवाहन
अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहा...
अकोले ( प्रतिनिधी ) गडकोट फक्त दगड मातीचे नसून आपल्या पूर्वजांचे श्वास आहेत. हिंदू स्वराज्याची प्रतीके आहेत. ३१ डिसेंबर हा परकीयांचा सण साजरा करण्याच्या नादात गड किल्ले घाण न करता त्यांचे पावित्र्य राखा असे आवाहन अकोले तालुका संस्कृती रक्षक दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे ३१ डिसेंबरला हरिश्चंद्रगड या ठिकाणी संस्कृती रक्षक दलाचे कार्यकर्ते हजर राहून चंगळवादी पर्यटकांना मद्यपान करणे, हिडीस नृत्य करणे, पुरातन वास्तूचे विद्रुपीकरण करणे या पासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन करीत आहेत. प्रथम विनंती करून आणि न समजल्यास चोप देऊन समजावले जाते त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. ३१ डिसेंबर ला पार्टी करा अथवा करू नका, नशा करा अथवा करू नका हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे मात्र त्यासाठी ऐतिहासिक व पवित्र ठिकाणांना आपले माध्यम बनवू नका. असे आवाहन अकोले तालुका संस्कृती रक्षक दलाच्या वतीने प्रदीप भाटे,बाळासाहेब मुळे,किशोर टेके,भाऊसाहेब वाकचौरे,राहुल ढोक,प्रमोद लहामगे,संतोष नेवासकर,अशोक लहामगे,संभाजी पोखरकर,निवृत्ती घुटे आदींनी केले आहे.
Comments
Post a Comment