संगमनेर-अकोले तालुक्याचे सुपुत्र ची कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात


संगमनेर- अकोले तालुक्याच्या "कवी" ची कविता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना साठी निवड
कळस गावासाठी भूषणावह बाब

कळस (प्रतिनिधी ) १०,११,१२  जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद येथे होणाऱ्या  ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कवी कट्टा' यासाठी अकोले कळस येथील कवी व लेखक डॉ विवेक वाकचौरे यांच्या कवितेची निवड झाली आहे
          या संमेलनात महाराष्ट्रातून १६५० कविता आलेल्या असून त्यापैकी फक्त ५०० च  कवितांचे गुणांकन करून त्यांची सादरीकरणा साठी निवड झाली.  महाराष्ट्रातील ३६  जिल्ह्यातून आलेल्या कवितांना एका जिल्ह्यातून साधारणत १२ कविता याप्रमाणे ४३२, तर महाराष्ट्राबाहेरील  ६८ अशाप्रकारे ५०० कवितांची निवड झाली आहे. त्यात वाकचौरे यांच्या  "निवांत आता झालो मी"  ह्या कवितेची निवड झाली असून ती,  ११ तारखेला सादर करणार आहे
        डॉ विवेक वाकचौरे हे कळस बु येथील रहिवासी असून त्यांची अनेक कविता  व लेख प्रकाशित झाले आहेत. "याची देही याची डोळा" हे पुस्तक ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गोपाल सबनीस यांचे हस्ते प्रकाशित झाले आहे.
        बडोदा येथे झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय  मराठी साहित्य संमेलनाच्या  कवि कट्टा वर  "आता राम नाही"  ह्या कवितेची निवड झाली होती तर पिंपरी चिंचवड येथे २०१६ मध्ये संपन्न झालेल्या ८९ वे  अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविकट्टा मध्ये " ८९ कवितांचा संग्रह " पुस्तकात "बळीराजा' ह्या कवितेचा समावेश  करण्यात आला होता.
        साहित्य कला आणि संस्कृति मंडळ ( तळेगाव दाभाडे) ने आयोजित केलेल्या  कथा कविता  स्पर्धेत " अघटीत " या कथेला  गो. नी. दांडेकर द्वितिय  पुरस्कार आणि "टाहो बळींचा" या कवितेला सुध्दा  लोककवि मनमोहन नातू  हा द्वितिय पुरस्कार प्राप्त होवून कविता सादरीकरणाचे उत्तेजनार्थ पारितोषिक  मिळाले आहे.
       वाकचौरे हे संगमनेर साहित्य कला, सांस्कृतिक संघाचे कार्याध्यक्ष आहेत. ते कवी लेखक असूनही अत्यंत उत्कृष्ट कलाकार आहेत तबला, पखवाज, हार्मोनियम, वादक असून गायक ही आहेत. सर्व कुटुंब च कलाकार आहेत.

Comments