शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना अकोले तालुक्यात
शिक्षकाने वर्गात च विद्यार्थ्यांन समोर अश्लील चाळे
अकोले ( विश्वासराव आरोटे ):- अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दत्तू पिचड नावाच्या शिक्षकाने मुलींशी अनैतिक चाळे केले असल्यामुळे आज तेथील ग्रामस्थ एकत्र येऊन या शिक्षक ला महिला ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना अकोले तालुक्यात घडली आहे. या शिक्षकाने अनेक मुलींची छेडछाड व गलिच्छ प्रकार केल्याचे उघडकीस आले त्यामुळे या भागांमध्ये शिक्षण क्षेत्राविषयी आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे आणि महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर गंभीरवाडी येथे अनेक मुलींची छेडछाड असे चाळे करणारा हा शिक्षक अनेक वेळा समज देऊन देखील या शिक्षकाने शाळेतील मुलींविषयी प्रकार केले आहे यापूर्वी ही त्याचे अनेक प्रकार उघड झालेले आहे तरी अकोले तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार या भागात घडला असून याविषयी शिक्षणाधिकारी काय भूमिका घेणार तर दुसरीकडे संतप्त ग्रामस्थांनी या शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे
तर अकोल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी तातडीने याप्रकरणाची दखल घेऊन संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले असून संबंधित अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी रमाकांत काटमोरे यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
अकोले तालुक्यातील शाळा मध्ये असे प्रकार होत असल्याची कुजबुज आहे
Comments
Post a Comment