प्रा. एस झेड देशमुख वाढदिवस

संस्कारक्षम विध्यार्थी घडवणे हि सर्वांची जबाबदारी
:- प्रा. एस झेड देशमुख
अकोले- (प्रतिनिधी ):- पालक व शिक्षक यांचा धाक हा विध्यार्थ्या वर असला पाहिजे तरच आदर्श पिढी घडू शकेल  आदर्श व संस्कारक्षम विध्यार्थी घडवणे हि सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन पतित पावन संघटनेचे प्रांत अध्यक्ष प्रा.एस.झेड.देशमुख यांनी केले.
          प्रा.देशमुख यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त माजी विद्यार्थी  यांच्या वतीने वनवासी कल्याण आश्रम अकोले येथील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कार्यक्रमात ते बोलत होत.
वृद्धपकाळा कडे जाताना आजही अनेक विद्यार्थी आठवण ठेवतात आपण चांगले विध्यार्थी घडविले याचा अभिमान वाटतो.  वनवासी कल्याण आश्रम देखील आदर्श विध्यार्थी घडविण्याचे  कार्य  करीत असून या ठिकाणी संस्काराचे पैलू पडण्याचे काम होत आहे असे गौरवपूर्व  उदगार काढले .
प्रारंभी प्रा. देशमुख यांचा यथोचित गौरव करण्यात येऊन वनवासी कल्याण आश्रमातील विध्यार्ध्याना नवीन स्वेटर चे वाटप करण्यात आले.
            यावेळी माजी विद्यार्थी व जनलक्षमी पतसंस्थेचे व्यवस्थापक आत्माराम रंधे, दूधगंगा चे व्यवस्थापक अशोक शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संजय भुजबळ, प्रा.अनिल नाईकवाडी,  प्रा,चंदू नवले ,प्रा.भाऊसाहेब नवले, बाळासाहेब मुळे, विनायक साळवे, राहुल ढोक, वनवासी कल्याण चे स्थानिक अध्यक्ष प्रा.दीपक जोंधळे, रामदास सोनवणे, बापू टेके डॉ. रवींद्र गोर्डे यांच्या सह अनेक माजी विद्यार्थी व हितचिंतक उपस्थित होते.
         यावेळी अगस्ती विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण मालुंजकर यांनी आपली नात ओवी हिच्या पहिला वाढदिवस साधेपणाने या ठिकाणी साजरा करून मुलांना कंपास व टॉवेल भेट देवून मुलांना मीष्ठान भोजन देऊन समजापुढे एक आदर्श निर्माण केला .
      यावेळी डॉ. साहेबराव गायकवाड, प्रदीप नवले, विश्वासराव अहिरे, स्नेहल मालुंजकर,संकेत मालुंजकर यांच्या सह नातेवाईक व परिवारजन उपस्थित होते सर्वांचे स्वागत व आभार वनवासी कल्याण आश्रम चे केंद्रप्रमुख मधुकर चोथवे यांनी मानले.

प्रा. एस झेड देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वनवासी कल्याण आश्रमातील आदिवासी विध्यार्थ्यांना थंडीच्या दिवसात उबदार नवीन स्वेटर मिळल्याचे पाहून तुनचर बालमन हरकून गेले त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले ल तसेच कंपास व टॉवेल मिळाल्याने त्यांनचा आंनद गगनात मावेना

 श्री क्षेत्र राममाळ येथे *उंचखडक बुद्रुक गावचे सुपुत्र* आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, *शिवव्याख्याते* तसेच *पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष* आदरणीय *प्राचार्य श्री.सोपानराव देशमुख तथा एस.झेड.देशमुख सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला *आदरणीय सरांनी* श्री क्षेत्र राममाळ येथील *श्री सद्गुरू संत यशवंतबाबांच्या समाधीला 🌹पुष्पहार🌹 अर्पण करून प्रभु श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शांचे दर्शन घेतले.
कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी शेतकरी नेते श्री संत सद्गुरू यशवंतबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.दशरथजी सावंत होते तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित *ट्रस्टचे सेक्रेटरी आदरणीय योगी केशवबाबा चौधरी देवस्थानचे महंत ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प.विठ्ठलपंत गोंडे महाराज, *अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक* तसेच *ट्रस्टचे उपाध्यक्ष आदरणीय श्री.अशोकराव देशमुख(आण्णा)*, *ट्रस्टचे जेष्ठ विश्वस्त आदरणीय श्री.तुकारामबाबा देशमुख* ट्रस्टी *श्री.दिलीपराव मंडलिक, श्री.देवराम पाटील शिंदे* त्याचबरोबर गावातील *सर्वच संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी* तसेच उंचखडक बुद्रुक गावचे *समस्त ग्रामस्थ उपस्थित होते* . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावचे माजी *कार्यक्षम सरपंच* तसेच *बुवासाहेब नवले मल्टी स्टेट पतसंस्थाचे संचालक माननीय श्री.महिपाल देशमुख (बबनभाऊ) यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी *श्री सद्गुरू यशवंतबाबा ग्रामविकास प्रतिष्ठाणचे सदस्य* तसेच *जिजामाता महिला दुध डेअरीचे उत्पादक* यांनी सहभाग घेतला

Comments