ना. नरेंद्र पाटील यांचा कार्य अहवाल सादर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री ची भेट घेऊन सादर केला अहवाल
मुंबई,दि.21:-  ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांची दि.19 डिसेंबर, 2019 रोजी नागपूर याठिकाणी भेट घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांव्दारे राज्यातील युवक उद्योजक होण्यासाठी केलेल्या कार्याचा अहवाल महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सादर केला.
           हिंदु-हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार युती सरकारने माथाडी कामगार आणि मराठा समाजाच्या न्यायासाठी अखेरपर्यंत लढा देणारे स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नांवाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सन 1998 मध्ये स्थापना केली होती, महायुती सरकारने या महामंडळाला पुनर्रजिवीत केले, युवकांना उद्योजक होण्यासाठी शासनाने महामंडळामार्फत विविध योजना जाहिर केल्या,महामंडळावर स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची दि.04 सप्टेंबर,2018 च्या शासन निर्णयाव्दारे नेमणुक केली व लोकसभेच्या निवडणुकीनंतर दि.10 जून,2019 च्या शासन निर्णयाव्दारे फेर नेमणुक केली होती. 
 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी नेमणुक झाल्यापासून नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे केले, मा.जिल्हाधिकारी,बँकांचे प्रमुख यांचेशी बैठका करुन अंदाजे 11525 युवकांना 550 कोटी रुपये एवढ्या कर्जाचे बँकांमार्फत वाटप केले. 
राज्य शासनाने विविध महामंडळे बरखास्त केल्याचे जाहिर केल्याने नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजिनामा मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरेसाहेब यांचेकडे दि.12 डिसेंबर,2019 रोजी सादर केला होता.
    नागपूर याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांची नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी भेट घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्याचा अहवाल त्यांचेकडे सादर केला,कार्याचा अहवाल स्विकारुन मुख्यमंत्री महोदय यांनी नरेंद्र पाटील यांचेशी चर्चा केली,या महामंडळाच्या अध्यक्ष पदाची पुन्हा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचेवर जबाबदारी सोपविणार असल्याबद्दल सुचित केले,त्याचबरोबर दि.12 डिसेंबर,2019 रोजी दिलेला राजिनामा परत घेण्याच्या सूचना केल्या.
 महाराष्ट्रात कष्टकऱ्यांची ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी करुन मराठा समाजासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नांवाने महामंडळाची स्थापना करुन या महामंडळाच्या अध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

Comments