राजूर च्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनात सोमलवाडी चा वळू ठरला चॅम्पियन

राजूर च्या प्रदर्शनात २०१९ चा चॅम्पियन वळू म्हणून अकोले तालुक्यातील सोमलवाडीचा सोमा भाऊ गंभिरे यांचा वळू
राजूर ( प्रतिनिधी ) अकोले तालुक्यातील महाराष्ट्रात सर्वात मोठे असे डांगी व सुधारित देशी जनावरांच्या प्रदर्शनात २०१९ चा चॅम्पियन वळू म्हणून अकोले तालुक्यातील सोमलवाडीचा सोमा भाऊ गंभिरे यांचा वळू निवडला तर उपचॅम्पियन म्हणून राजाराम भीमा घोटे रा. धामणी ता. इगतपुरी यांच्या वळू ची निवड करण्यात आली

        सालाबादप्रमाणे राजूर येथे चार दिवस चालणाऱ्या सुधारित देशी व डांगी जनावरे, शेतीमालाच्या प्रदर्शनात काल वळू निवड स्पर्धा झाली. नगर, नाशिक, ठाणे, पुणे जिल्ह्यातून ही जनावरे मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात . यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी-विक्री होते.
               यात चॅम्पियन, उपचॅम्पियन निवडीबरोबरच अदातमधून पेढेवाडी ता. अकोले येथील अमृता मुरलीधर कुल्हाळ यांचा वळू प्रथम आला तर सहा दातीमधून पाडळी ता. सिन्नर येथील शरद निवृत्ती होलगिर यांचा वळू प्रथम आला. आठ दातीमध्ये मांजरगाव ता. इगतपुरी येथील विष्णू शंकर बांडे यांचा वळू तर धामणी ता. इगतपुरी येथील भाऊसाहेब कचरू भोसले यांची डांगी कालवड प्रथम आली. गाभण गायीमध्ये धामणी येथील अमोल सुरेश भोसले यांची गाय प्रथम आली. नाशिक येथील हितेश पाटील यांच्या दुभत्या गायीने प्रथम क्रमांक मिळविला. मोगरे येथील काशिनाथ लोहरे यांची डांगी बैलजोडी प्रथम आली. 

        यानिवडी पशुवैद्यकीय सहायक आयुक्त जे.के.थिटमे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. अशोक धिंदळे, पशुधन अधिकारी पी.एम. पोखरकर तसेच सरपंच हेमलता पिचड, उपसरपंच गोकुळ कनकाटे, ग्रा. सदस्य गणपतराव देशमुख, पंस समिती सदस्य दत्ता देशमुख, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, माजी सरपंच संतोष बनसोडे आदिवासी सेवक काशिनाथ साबळे आदि प्रमुख ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या
        तत्पूर्वी शेतकऱ्यांना आधुनिक शेती व तंत्रज्ञान ची माहिती प्रदर्शनाचे उदघाटन राजूर च्या सरपंच मातोश्री हेमलताताई पिचड यांचे शुभहस्ते करण्यात आले तर स्टॉलचे उदघाटन भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील पत्रकार हेमंत आवारी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी  उपसरपंच गोकुळशेठ कानकाटे, पंचायत समितीचे सदस्य दत्ता देशमुख, दत्ता बोऱ्हाडे माजी सरपंच संतोष बनसोडे, पत्रकार शांताराम काळे, राजेंद्र गवांदे, देविदास शेलार सर आदी उपस्थित होते.
         मंगळवार दिनांक १७ प्रदर्शनाची सांगता होणार असून बक्षीस वितरण समारंभ ही होणार आहे.

श्री.भाऊसाहेब वाकचौरे पाटील

Comments