दान करायचेच असले तर स्वकमाईतुन करा :- ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर
अकोले ( प्रतिनिधी ) :- कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करा, सातत्याने कष्ट केल्यानेच यश मिळते. कष्टानेच माणुन मोठा होतो. प्रत्येक कामात एकनिष्ठेने काम केल्यास ध्येय निश्चित पूर्णत्वास जाते. मात्र त्यासाठी जिद्द आवश्यक आहे. समाजात श्रीमंतांची संख्या मोठी असली तरी, दान करणारे बोटावर मोजण्याइतपतच असतात. आणि दान करायचेच असले तर स्वकमाईतुन करा असा सल्ला ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिला.
अकोले तालुक्यातील श्रीक्षेत्र इंदोरी येथे देशमुख महाराजांच्या पिताश्री स्व. काशिनाथ देशमुख व मातोश्री स्व. इंदुबाई देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजीत सोहळ्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर शनिभक्त संत सुखदेव महाराज, अगस्ती देवस्थानचे विश्वस्त किसन लहामगे, अॅड. लक्ष्मण खेमनर, राहुरीचे उपसभापती अण्णासाहेब बाचकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख महाराज म्हणाले कि दान हे कष्टाचे असावे. अवैध व्यवसायातुन मिळविलेला पैसा धार्मिक व सामाजिक कार्यासाठी दान म्हणून स्विकारू नका. त्यातुन पुण्य लाभत नाही. ज्ञानाशिवाय वैराग्य टिक नाही. तुळशी माळेत 108 मणी असतात, जगात एकुण 108 तिर्थ आहेत. जगात आई व वडील हेच तिर्थ आहे, त्यांची सेवा करा. हरिनामात हरी शब्द 108 वेळा आला म्हणून माळेमध्ये 108 बारीक मणी असतात.
ज्ञान हे प्रयत्नाशिवाय टिकत नाही. माणसाला उत्तम व परिपूर्ण घडविण्यासाठी ज्ञान महत्वाचे आहे. प्रारब्ध टिकण्यासाठी कुणाच्या तरी आशिर्वादाची गरज असते. नामाची ताकद वाढवा. प्रारब्ध चांगले नसले तरी नामस्मरणाच्या ताकदीने बळवता येऊ शकते. समाजात टिका करणार्यांची संख्या वाढली. ही संख्या वाढल्यास सृष्टीच्या नियमानुसार त्यालाच न्याय मिळतो. आपण गरीब असलो तरी प्रामाणिक रहा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संत सुखदेव महाराज, अॅड. लक्ष्मण खेमनर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पं.स. सदस्य अशोक सातपुते यांची भाषणे झाली. सप्ताह काळात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोठुळे, तुळशीराम महाराज काकडे, माऊली महाराज कुर्हाडे, ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांनी किर्तन सेवा दिली.
संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य केशव देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाराजांचा जीवनपट उलगडविला. सूत्रसंचालन ह.भ.प.दीपक महाराज देशमुख व प्रा. गणपत नवले यांनी केले. उपस्थितांचे आभार गंगाराम देशमुख, बाळासाहेब देशमुख यांनी मानले.
यावेळी इंदुरीकर महाराज यांनी आपले गळ्यातील तुळशीची माळ आपले शिष्य अमित वाकचौरे यांच्या गळ्यात घालून माळकरी केले अमित हा महाराज यांचे सर्व कीर्तन फेसबुकवर live करत असतो
यावेळी उपस्थित वारकरी व किर्तनकारांना 3 लाख 70 हजाराचे मानधन देण्यात आले.
इंदुरीकर महाराज यांचे कीर्तनात गाणकोकिला असणारे किरण महाराज शेटे यांचा सर्व शिष्यानी विशेष सन्मान केला
भाऊसाहेब वाकचौरे पाटील
धन्यवाद
ReplyDelete