फळाची अपेक्षा न ठेवता चांगले कर्म करा हीच गीतेची शिकवण :- मोहनजी भागवत
संगमनेर (प्रतिनिधी ) आपण जीवनात चांगले कर्म करीत रहावे फळाची अपेक्षा न ठेवता हेच गीता तत्वज्ञान आहे ते प्रत्येक नागरिकाने ते अंगिकरावे त्यायोगे भारत ही महाशक्ती होईल असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले
संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर गीता परिवाराच्या वतीने आयोजित गीता महोत्सवामध्ये श्री भागवत बोलत होते. यावेळी योगगुरू स्वामी रामदेवबाबा, गीता परिवाराचे अध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, डॉ संजय मालपाणी हे व्यासपीठावर उपस्थिती होते
यावेळी श्री मोहनजी भागवत यांनी गोष्टीतुन आपले म्हणणे समजावून सांगितले काही व्यक्तींना कितीही मिळाले तरी त्यांचे मन आपल्या च भावनेत गुंग असतात एका राज्यात भिकारी व भिकारीण यांनी लग्न करायचे ठरवले त्यावेळेस आपले कडे काही पैसे असावे म्हणून भिकाऱ्याने नगराच्या बाहेर ढब्बू पैसा आहे तो घेऊ असे म्हणून ते तिकडे निघाले मात्र त्याचवेळी राजाची सवारी पुढून येत होती सगळे नागरिक राजाबरोबर चालले होते मात्र हे दोघे विरोधी दिशेने जाताना दिसले त्यावेळेस शिपायांना बोलावून त्यांना राजाने बोलावून घेतले त्यानी काम सांगितले तेव्हा राजा एक सोन्याची मोहोर देण्याचे कबूल करतो मात्र ते ढब्बू आणण्यासाठी जायचे म्हणतो राजा दोन मोहरा, दहा , शंभर, हजार, लाख कोटी मोहरा देण्याचे कबूल करतो पण हा भिकारी मानीत नाही शेवटी राजा अर्ध राज्य देण्याचे कबूल करतो मग मात्र ती भिकारीण त्याचा शर्ट ओढून मान्य कर म्हणती तो मान्य करतो राज्याभिषेक होतो राजा त्याला जेवणच निमंत्रण देतो तरी भिकारी जो आता राजा झालेला असतो तो म्हणतो मी आलोच , राजा म्हणतो आता कुठं चालला तो भिकारी राजा म्हणतो माझा ढब्बू आणायला म्हणजे कितीही दिले तरी तो भिकारीच असतो
जीवनात आपले ध्येय , लक्ष गाठायचे असेल तर कितीही संकट येऊ, कोणी कितीही घाबरू अथवा आमिष दाखवू तरी विचलित न होता आपले पथ पर चालत राहिले तोच जीवनात यशस्वी होतो असेही मत त्यांनी व्यक्त केले.
देशात अत्याचार व हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहे. पण हे थांबण्यासाठी चांगले संस्कार हा उपाय आहे. गीता चे आचरण करणारा कधीही वाईट वागणार नाही असे मत योगगुरू रामदेवबाबा यांनी व्यक्त केले.
सामान्य कुटूंबात जन्माला आलेले ९९ टक्के लोकांनी प्रगती केली आहे. माझ्या शिक्षणासाठी फक्त पाचशे रुपये खर्च झाला आणि आज तुमच्यासमोर मी उभा आहे. सर्व जग तुमच्या मागे फिरून मला तुमच्या सारख होयच ये, असे म्हणेल अस काम करा असेही स्वामी रामदेव यांनी सांगितले.
याप्रसंगी स्वामी रामदेव यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना योगाचे धडे दिले. त्याला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. शिरसासन व हातावर चालण्याच्या आसना ना दाद दिली.
यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या ७१ व्या जन्मदिनानिमित्ताने पूजन करण्यात आले तर डॉ संजय मालपाणी यांनी वयाची ५० वर्ष पूर्ण केले बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गीतेचा १२ व १५ व्या अध्याय चे सामुदायिक पठण करण्यात आले. यावेळी विविध राज्यातून आलेले विद्यार्थी एका वेष भूषेत होते.

Comments
Post a Comment