अकोले त जल्लोष, राज्यात भाजप सरकार

अकोलेत जल्लोष, राज्यात भाजपचे सरकार
वैभवराव पिचड यांनी मुख्यमंत्री यांचे केले स्वागत
अकोले (प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टी चे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या ने अकोले शहरात  फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला
        राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झालेमुळे कार्यकर्त्यां मध्ये उत्साह संचारला आहे. अकोले चे भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बुके देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत तर तालुक्यात भाजपचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, जेष्ठ नेते गिरजाजी जाधव, यशवंत अभाळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी पेढे एकमेकांना भरून आनंद साजरा केला
     अकोले नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक सचिन शेटे, नामदेव पिचड, परशराम शेळके, सुरेश लोखंडे, सोनाली नाईकवाडी, प्रकाश नाईकवाडी, चेतन नाईकवाडी,भोईर गुरुजी, नवनाथ गायकवाड, हितेश कुंभार यांनी महात्मा फुले चौक, व बसस्थानक समोर फटाके फोडत घोषणा बाजी करून जनतेला पेढे वाटून आनंद साजरा केला.
      भाजपचे आमदार संपर्क कार्यालयाचे समोर राहुल देशमुख, विजय पवार, कविराज भांगरे, राहुल बेनके, नाजीम शेख, सुशांत वाकचौरे, संतोष खताळ, विनोद देशमुख, निलेश चौधरी, हुसेन मन्सूर, बाबासाहेब अभाळे, दादाभाऊ मंडलिक, सचिन वैद्य, शशिकांत पवार, मंगेश चव्हाण, दत्तू शेलार, दुर्गेश लोखंडे यांनी पेढे वाटले व आनंद साजरा केला.

Comments